🐦🍛काकस्पर्श  :एक  आगळीवेगळी फसलेली order

AddTextToPhoto(7-6-2016-5-24-35)

भटकंती , खाण्याची आवड असलेले लोक अनुभव समृध्द असतात . शब्दश: ठेचा खाउन  शहाणे होतात हे पटवून देणारा अनुभव नुकताच आम्हाला आला.  वेगवेगळे खाद्य पदार्थ  खाण्याची उर्मी आणि हिम्मत असणार्या  लोकांच्या गटातले आम्ही म्हणजे मी  आणि माझा  नवरा, एवढ्यात नवीनच सुरु झालेल्या इक हॉटेल  मध्ये गेलो होतो .

तसे japenese  पदार्थ थोडेफार try केले आहेत पण  …shashlik exotica( वाचताना ते मी Salisalic acid वाचले तोः भाग  वेगळा)  …  खाऊन बघावा म्हणून order  केला.डिश चे वर्णन तोंडाला पाणी आणणारे होते आणि  विनाकारण खूप ओळख असल्यासारखी गप्पा मारणारी waitress पण order choice किती छान ए वैगेरे उगाच बोलत होती.

एकंदरीत वाट बघायला लावून dish  समोर आली . आपली पोह्याची dish हि जरा मोठी असेल अशा plate मध्ये ४ प्रसादाच्या वाटी एवढ्या भाताच्या मुदा . त्यावर so  called  exotic  veggies .ते बघून आम्हाला काय आठवावे तर …..

दहाव्या च्या दिवशी  पारावरभाताचे  मांडलेले पिंड ……!!!!

हसताना काव काव आवाज येतोय आपला असाही भास झाला मला .आजूबाजूंच्या कावळ्यांची पर्वा न करता अशक्य हसत राहिलो.एका पिंडावर sorry  shashlik  वर  तर काळे तीळ पण होते olive  oil  बरोबर . थंडगार अगदी गार गार भाताचे ते आंबट चवीचे पिंड केवळ शिजवणार्या चा आत्मा  भटकत राहू नये म्हणून आम्ही शिवले आणि काक स्पर्श झाला .बिल घेऊन आलेली मघाची waitress आता मला  चक्क The Game of Throne  मधल्या Bryan च्या स्वप्नात येणारा three eyed raven (तीन डोळ्यांचा कावळा ) वाटू लागली होती.

अजून काही विपरीत वाटायच्या आत उठलो आणि पारावरून उडालो.

इति काव काव

डॉ. रुपाली पानसे

पुणे

 

3 thoughts on “🐦🍛काकस्पर्श  :एक  आगळीवेगळी फसलेली order

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s