Fever fever …everywhere!

fever1

आज एक विनोद वाचनात आला . ” जसे गांडूळ ला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात,, तसे डासांना डॉक्टर चा मित्र म्हणतात ” हसू आले आणि एवढ्यातच एका ग्रुप वर, “viral fever ने जे थैमान घातलेय त्याबाबत लिहाल का?” अशी वारंवार आलेली सूचना आठवली .

म्हणायला हा साधा ताप patients  बरोबर आम्हा डॉक्टर्स ची हि धांदल उडवतो आहे. अपेक्षित न येणारे रिपोर्ट्स, हवे तसे परिणाम न दाखववणारी औषधे , तापानंतरचे सांधेदुखी , भूक मंदावणे , कोरडा न जाणारा खोकला असे एक ना अनेक तक्रारी रुग्णास बेजार करत आहेत.

या सगळ्या गोष्टीवर चे प्रतिबंधक उपाय , magic टिप्स , magic औषधे, सोशल मीडिया वॉर धुमाकूळ घालत आहेत आणि त्यामुळे स्वतः स्वतःवर औषधांचा प्रोयोग करणारे गोष्टी अजून अवघड करून घेताना दिसत आहेत . आधीच भारतात  ऑन काउंटर औषधी देणारे कमी होते कि काय त्यात ऑन व्हाट्स अँप आणि ऑन फेसबुक औषधी देणाऱ्यांची भर पडली .

माझी पोस्ट ह्या सगळ्या प्रकारात एक डॉक्टरची भूमिका काय असते /असावी आणि patient  म्हणून एक ठराविक सद्सद्विवेक बुद्धी कशी दाखवावी याबाबत आहे . जेणेकरून patient चा त्रास कमी होईल आणि डॉक्टरांची मेहनत वाचेल.

fever2

डेंग्यू असो चिकन गुनिया , विषमज्वर , सर्दी तापाचा खोकला या सगळ्या प्रकारच्या तापांसाठी allopathy तसे आयुर्वेदिक डॉक्टरांचा एक प्रोटोकॉल ठरलेला असतो.

  1. कुठलाही ताप असो कृपया अंगावर न काढता , स्वतःची स्वतः औषधे न घेता आपल्या फॅमिली डॉक्टर ला दाखवा आणि सल्ला घ्या . डॉक्टर allopathy आयुर्वेदिक अथवा दुसरा कुठला असो कृपया सल्ला नीट पाळा. allopathy डॉक्टरांना पपईचा रस पिऊ का ?,हा काढा घेऊ का , साबुदाण्याच्या गोळ्यांनी बरा होतो म्हणे, असे विचारून त्यांच्या वरील अविश्वास दाखवून संभ्रम वाढवू नका . तसे आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेलात तर ” मला वाटते antibiotic ची गरज आहे डॉक्टर, काढा नंतर काम करेलच पण तरीही ..” असे बोलून चिकीत्सेत अडथळा आणू नका . एक पेक्षा अधिक प्रकारच्या चिकीत्सेची मदत घेणार असाल तर संबंधित डॉक्टरांना त्याची कल्पना द्या विश्वासात घ्या.
  2. आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये खाण्या पिण्यासंबंधित सूचना काटेकोरपणे पाळा. सुचवलेले आहार हे एक प्रकारचे औषध म्हणून कार्य करत असतात त्या गोष्टीला कमी लेखू नका आणि कुपथ्य टाळा . सुचवलेली साधी , यूष (सुपाचा प्रकार ), धान्य , भाज्या , फळे हे खूप विचार करून आयुर्वेदिक चिकित्सक तुम्हास सांगत असतो . ते अवश्य पाळा.
  3. सुचवलेली काढे , गोळ्या , चूर्णे दिलेल्या सूचनांप्रमाणे घ्या आणि चिकित्सक सांगत नाही तोवर स्वतःच्या मनाने बंद      करणे dose  बदलणे असे कृपया करू नका. हे alopathy औषधांनाही लागू आहे.
  4. रुग्णालयात दाखल केंव्हा करावे हे डॉक्टरांना ठरवू द्या आणि त्याप्रमाणे योग्य ती कृती करा . गरज पडल्यास सेकंड ओपिनियन अवश्य घ्या .
  5. असले आजार म्हणजे डॉक्टरांची चंगळ, पैसे कमवण्याचे दिवस असे समाजातील मालप्रॅक्टिसे जरी मान्य केली तरी कुठलाही पॅथी चा डॉक्टर हा प्रत्येक वेळी ह्या गटातला नसतो . तेंव्हा जो निर्णय घ्याल तोच नीट समजून उमजून घ्या , म्हणजे फसवणूक झाली असे वाटायला नको . रुग्णाची जबाबदारी घेणे हे अतिशय तणावाचे आणि अवघड काम चिकित्सक 24 तास करत असतो हे अवश्य ध्यानात ठेवावे.
  6. सुदैवाने आयुर्वेदिक , होमिओपॅथी औषधांचा खूप उत्तम परिणाम जिथे मोठी मोठी antibiotic निष्फळ होतंय तिथेही दिसून येतोय . सद्सद विवेक बुद्धीने योग्य एक अथवा दोन्ही pathy चा उपयोग केल्यास रुग्णाचा त्रास वाचतो आणि चिकित्सा यशस्वी होते . ऍलोपॅथी,आयुर्वेद , होमिओपॅथी या चिकित्सकांनी रुग्ण हित हि सगळ्यात महत्वाची बाब लक्षात घेऊन व्यर्थ आत्मविश्वास , अहंकार दूर ठेवून एकमेकांची मदत घ्यावी . इंटिग्रेटेड मेडिसिन हा मुद्दा खूप महत्वाचा आहे .
  7. आपल्या आजारपणाच्या अनुभवाचा दुसर्यांना औषध सुचवण्यापेक्षा योग्य दिशा दाखवण्यासाठी उपयोग करा.
  8. तुम्हाला मिळणाऱ्या असंख्य सूचना , औषध आणि मी सांगते घे ग , मी 100% खात्री देतो अशा लोकांपासून दूरच राहा
  9. वाचून ऐकून कुठलेही  प्रयोग करण्याआधी आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या .
  10. सगळ्यात महत्वाचे आपला फॅमिली डॉक्टर अश्या वैद्यास /चिकित्सकास बनवा कि तुम्हाला google , व्हाट्स अँप ची मदत घेण्याची गरज च न पडो .

कुठलेही रामबाण उपाय , टिप्स आणि juice , बियांचे सल्ले न दिल्यामुळे काही जण नाराज असतील . वरील प्रोटोकॉल पाळायची खूप गरज आज आहे. काहीही कसेही पटले म्हणून ह्या मनोवृत्तीमुळे आपण आपले पैसे , वेळ आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले अमूल्य आरोग्य धोक्यात घालत  असतो.म्हणून हि पोस्ट लिहण्याचा खटाटोप .

ताप आणि घ्यावयाची काळजी असे वैयत्तिक काही प्रश्न असल्यास कृपया अवश्य विचारावे आणि सल्ला घ्यावा .

वैद्य रुपाली पानसे ,

आद्यं आयुर्वेद

9623448798

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s