खाताना हा विचार नक्की करा!

Image result for images food globe

स्थानिक पारंपरिक पदार्थच का खावे ? स्थानिक आहारीय अन्न च का वापरावे ?
माझ्या लेखांचा भर स्थानिक अन्न आणि पारंपरिक पदार्थांवर असतो. फक्त शरीराला चांगले म्हणून खा एवढा मर्यादित हा विषय नाही. स्थानिक प्रदेशात होणारे अन्न ,भाज्या, फळफळावळ खरेदी करणे आणि खाणे याचे सर्वगामी परिणाम सकारात्मक कसे होऊ शकतात. हे थोडक्यात बघू .

 • स्थानिक पदार्थ हे त्या त्या भौगोलिक प्रदेशातील हवामानानुसार पिकत असतात.पिंडी ते ब्रह्मांडी नियमानुसार हीच गत आपल्या शरीराची असते.आजूबाजूच्या भौगोलिक प्रदेशाचा,राहणीमानाचा,आपल्या प्रकृतीच्या जडणघडणीत वाटा असतो.तेंव्हा अन्न म्हणून त्याच प्रदेशात पिकलेली फळे, धान्य आणि इतर खाद्यपदार्थ हि प्रकृतीला जास्त सात्म्य असतात.
 • स्थानिक अन्न हे त्या त्या प्रदेशानुसार त्या त्या ऋतूमध्ये पिकलेले असते .त्या त्या ऋतूत होणारी फळे धान्ये आणि भाजीपाला त्या प्रदेशातील लोकांना हितकर असतात.उन्हाळ्यात मिळणारे कलिंगड, आंबे असो वा हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या शेंगांच्या विविध भाज्या अथवा टपोरे आवळे . त्या विशिष्ट ऋतूंमुळे त्यात निर्माण झालेले गुणधर्म शरीरातील स्वास्थ्य टिकविण्यास उपयुक्त असतात. अतिशय थंड हवामानाच्या हजारो मैल लांब असलेल्या देशातील अतिरिक्त उर्जे साठी बनवलेला पचायला अतिशय जड चीज जर आपण इथे महाराष्ट्रात भर उन्हाळ्यात दाबेलीवर यथेच्छ किसून ‘पाव कम चीज ज्यादा’असा खाल्ला तर परिणाम काय होतील याची कल्पना न केलीली बरी.(परत नमूद करते खूप प्रमाणात आणि सातत्याने खाणे हा खरा मुद्दा आहे. कधीतरी आणि कमी प्रमाणात हा वेगळा मुद्दा.)
 • स्थानिक अन्नास प्राध्यान दिल्याने स्थानिक व्यवसायास प्रोत्साहन मिळते.आपण राहतो त्या प्रदेशातील व्यवसायास आपली हि सवय आर्थिक दृष्ट्या सबळ बनवते.उदा.दूर देशातून आयात केलेले महागडे चीज सॉस,वेगवेगळे स्प्रेडस, नाचोंस याऐवजी जर लोणची, चटण्या ,खाकरा ,पापड खरेदी वर भर दिला तर जवळील भागात लघु उद्योगांना चालना मिळते.आपण राहतो त्या समाजाचा आर्थिक स्तर या छोट्या कृतीने वाढायला हातभार लागतो. अजून उदाहरण द्यायचे झाले तर वेगवगेळे देशी विदेशी हेअल्थ ड्रिंक्स.त्याऐवजी घरगुती लघुउद्योग निर्मित सरबतांसारखे पेय खरेदी केलीत तर आरोग्य आणि समाजभान याचा उत्तम मेळ साधला जाईल.एखाद्या महागड्या चेन असलेल्या विदेशी हॉटेल मध्ये जाऊन कॉर्न टिक्की खाण्यापेक्षा गाडीवरचं भाजलेले मका कणीस दहा पटीने शरीराला चांगले ठरते.
 • स्थानिक अन्न हे खूप दुरून येत नसल्याने कमी प्रवासखर्च,टिकवण्यासाठी केले रासायनिक प्रक्रिया विरहित असे ताजे आपल्यापर्यंत पोचू शकते.उदा. द्यायचे झाले तर लिची नावाचे फळ थंड हवामानाच्या मुख्यतः चीन, मलेशिया देशातून येते.मुळात टिकायला नाजूक असलेले हे फळ तिथून भारतात त्यातही महाराष्ट्रात पोचेस्तोवर टिकण्यासाठी निश्चित त्यावर प्रक्रिया होत असणार.तीच गोष्ट चेरी,किवी,ड्रॅगन फ्रुट यांची.अर्थात आज आपल्या राज्यात पिकणाऱ्या फळ भाज्यांवर हि रासायनिक प्रक्रिया होतात हि दुःखाची बाब आहे. पण तरीही हि मूळ मुद्दा अबाधित राहतोच.
 • स्थानिक आणि पारंपरिक पदार्थ हे वर्षानुवर्षे पिढ्यान पिढ्या सेवनात असल्यामुळे थोडक्यात ते टेस्टेड आणि सर्टिफाइड असतात असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. कोलेस्टेरॉल चा बाऊ करून तुपाला वाळीत टाकणारे शास्त्रद्न्य आज तुपातील ओमेगा फॅटी ऍसिडस् चे कौतुक करताना दिसतात. याही उपर जाऊन कोलेस्टेरॉल चा बाऊ करायची गरज नाही असेही आता संशोधन पुढे येते आहे. असो महत्वाचा मुद्दा असा आहे कि ,
 • स्थानिक अन्न आणि खाद्यपदार्थ हे वैयक्तिक पातळीवर आरोग्याकरिता आणि एकंदर समाजाच्या दृष्टीने पण सुदृढ असते.

अन्नसंस्कृती हि समाजाच्या संस्कृतीचा आरसा असतो. एकमेकांच्या सुदृढतेला पोषक असलेली हि छोटी सवय हळू हळू अंगी बाणली, तर फायदा समाजाचा न पर्यायाने तुमचा माझा आपला आहे.

https://lindym.files.wordpress.com/2010/12/sun-newsapaer.png

3 thoughts on “खाताना हा विचार नक्की करा!

 1. खूप छान माहिती , नक्की सर्वाना share केली तर आपल्या येथील ऋतू मधील भाज्या व फळे आरोग्य करिता का महत्वाची आहे ते समजेल

  Like

 2. आपल्या इतर लेखांप्रमाणेच माहितीपूर्ण , खुसखुशीत व पचायला हलका लेख 🙂

  Like

 3. Good write up. Important thing is ‘Water and Carbon footprint ‘ is very high in these imported items. So if we want to save our environment and natural resources, use of local food is very important

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s