A wise doubt!

सजग वाचक प्रश्न/शंका? (अ बाउल ऑफ डेड फूड)

माझ्या रेडी तो ईट पदार्थांवरील ब्लॉग वर एका वाचकाने खूप चांगली शंका विचारली. बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न आला असेल. तो प्रश्न आणि त्याचे समाधान हा एक स्वतंत्र मुद्दा असलेला लेख झाला.
प्रश्न असा होता.,
राजस्थान सारख्या प्रदेशात वर्षभरासाठी भाज्या वाळवून ठेवून वापरतात. तसेच खारवलेले मासे, इतर मांस हे वर्षानुवर्षे परंपरेत आहेत. ते योग्य कि अयोग्य?
त्यावरील माझे मत पुढे देत आहे.
अतिशय रास्त आणि महत्वाचा प्रश्न विचारलात आपण.मूळ लेखात हा मुद्दा लिहायचा राहून गेला होता. आपल्या प्रश्नाच्या निमित्ताने मांडला जाईल.
आपल्या कडे वाळवण,बेगमी चे पदार्थ,सांडगे वड्या कुरडया पापड लोणची हे पदार्थ देखील तसे पहिले तर रेडी तो ईट प्रकारातच मोडतात.मग फक्त विरोध वरील पदार्थानाच का. मुळात पहिली गोष्ट विरोध नाही. ताजे अन्न न खाता खूप मात्रेत रोज खाण्याला थोडी हरकत असते,ती पण तुमची तब्येत हरकत घेते.
मुखयतः वाळवणाचे पदार्थ, लोणची हे बनवण्या मागचा उद्देश हा थोडा असा असायचा कि जेंव्हा दुष्काळ, अतिवृष्ट्टी दळवळणाची अपुरी सोय यामुळे भाज्या मुबलक नसतील,अचानक पाहुणे घरी आले,घरी कार्य असेल तर वेळेवर गृहिणीला हे पदार्थ मदतीला धावून येत.त्या काळी बिग बास्केट डॉट कॉम नव्हते किंवा होम डिलिव्हरी देणारे हॉटेल हि.
त्यामुळे हे पदार्थ अशाच वेळी फडताळातील लख्ख घासलेल्या पितळी डब्यांतून ताटात डोकावायचे.
अजून एक खूप महत्वाचा मुद्दा. हे पदार्थ करताना ते टिकावे म्हणून त्यात सैंधव,तेल, मसाल्याचे काही पदार्थ,लिंबाचा रस, गुळाचा अथवा साखरेचा पाक असे साधे सोपे सरळ मार्ग आपण वापरतो.वेगवेगळे रसायने, रंग, चव यांचा वापर निश्चितच होत नाही.त्यामुळे अशा पदार्थांपासून होणारे शरीरावरील परिणाम अर्थातच तुलनेने कमी होतात.तरीही व्हिटॅमिन c आहे म्हणून आपण कैरीचे लोणचे वाटीत घेऊन नाही खात अथवा रोज खाल्ले तर बाधणारच.तसेच पापड,वाळवलेल्या भाज्या,खारवलेले मासे इत्यादींचे होय.
वाळवलेल्या भाज्या खाणे तर निश्चित योग्य नाही. अशा भाज्यांचा मुख्यतः वरणात, किंवा इतर व्यंजनात वरून काही चमचे इतक्या प्रमाणातच उपयोग ग्राह्य. कसुरी मेथी ची भाजी नाही करत. इतर व्यंजनात ती चिमूटभर तिच्या अरोमा साठी वापरतात.तीही कधीतरीच वापरली तर योग्य.
उन्हात वाळवलेले वाळवण हि स्लो हीट किंवा मंद उष्णता देण्याचे चे किती आदर्श उदाहरण आहे. अतिशय उच्च तापमानात एकदम वाळवलेले पदार्थ पोषणमूल्ये रहित होणारच.याउलट उन्हामध्ये ज्याला सूर्यताप असे म्हणतात ,वाळवलेले पदार्थ तुलनेने पोषणमूल्ये राखून असतात.
परत एकदा खूप धन्यवाद हा प्रश्न विचारल्याबद्दल !
असे प्रश्न, प्रतिक्रिया स्वागतार्ह च असतात.
वैद्य रुपाली जोशी पानसे
आद्यं आयुर्वेद, पुणे
९६२३४४८७९८
drrupalipanse.wordpress.com
rupali.panse@gmail.com
(कृपया लेख आवडल्यास मूळ लेखात फेरफार न करता तसेच लेखिकेचे नाव व इतर माहिती यासकट पोस्ट अथवा शेअर करावा. आपल्या या कृतीने लिखाणासाठी काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागते.)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s