सौंदर्य ,मीडिया आणि बळजबरीचा आयुर्वेद!
आज सगळ्यात जास्त एनकॅश जो विषय होतो ते सौंदर्य, जनमानसावर सर्वात जास्त प्रभाव टाकणारे माध्यम मीडिया आणि ज्याच्या नुसत्या नावाने काहीही खपू शकते असा बिचारा आयुर्वेद हे तीन वर वर काहीच संबंध नसणारे टोकाचे विषय आज जाणून बुजून ,ठरवून एकत्र आणले गेले आहेत. मिलियन डॉलर मार्केट आणि कोर्पोरेट स्ट्रॅटेजी ची माया!
कमीत कमी शब्दात हा विषय पोचवण्याचा प्रयत्न करतेय,लिहत गेले तर पुस्तक सहज होईल यावर!
सौंदर्य म्हणजे काय ? गोरी त्वचा (मुलींची आणि हल्ली मुलांची देखील) हि सर्रास व्याख्या आज सौंदर्याची झालीये, नव्हे ती जाणूनबुजून करण्यात आलीये आणि आज आपल्याला पटायला देखील लागलीये.आज नव्हे तर पिढ्यानपिढ्या समाजमत असे होत गेलेय. समाजातील याच चुकीच्या रुजलेल्या रुढीची परिणती सौंदर्य निर्मिती क्षेत्रातील अफाट वाढीत होतेय नव्हे झालीये. माणसाला वाटणारे ‘शॉर्ट कट’ चे आकर्षण हा एक शापच म्हणायला हवा.काही आठवडे क्रीम लावा नि गोरे व्हा ,आयुष्य इतके सोपे असते का?परंतु मिनिटं मिनिटाला लागणाऱ्या TV वरील जाहिराती, पानं च्या पानं भरून गोरीपान कांती दाखवणारी गोरेपणाच्या क्रीम ची मॉडेल यासारख्या गोष्टींचा इतका भडीमार सतत होतो कि ते पटायला लागते, खरे वाटायला लागते.कारण जाहिरात करणारे कुठेतरी आपलेच आदर्श असतात,हिरो आणि हिरोईन! सौंदर्यवर्धक उत्पादकांचा टार्गेट ऑडियन्स सहज या फसव्या जगाला बळी पडतो.
खरे सौंदर्य काय? मुलींमध्ये वयानुसार सहज होणारी शारीरिक मानसिक वाढ, स्त्रीसुलभ भाव व जबाबदारी, निकोप शरीर आणि मन ,आत्मविश्वास आणि सर्वात महत्वाचे स्वतःला स्वतःच्या गुण दोषांसकट स्वीकारून स्वतःमध्ये एक माणूस म्हणून बदल घडवणे, हे खरे सौंदर्य होय. तसेच मुलांमध्ये व्यायाम करून कमावलेले उत्तम शरीर, वाढत्या वयानुसार एक व्यक्ती म्हणून असलेले समाजभान, जबाबदारी,साहसी खेळ,समाजाला उपद्रव नाही तर अभिमान वाटेल असे वागणे म्हणजे खरे सौंदर्य होय.क्रीम फासून गोरे होण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न म्हणजे तारुण्याचा अपमान च होय.
या सगळ्यात मीडिया चा काय रोल?
मीडिया मध्ये प्रिंट मीडिया(म्हणजे वृत्तपत्र,मासिक,साहित्य इत्यादी),audiovisual मीडिया ज्यात TV ,चित्रपट इत्यादी येतात या गोष्टींचा youth ,तरुण वर्गावर सर्वात जास्त प्रभाव असतो. एखाद्या समाजाचे मत तयार करणे ,थोडक्यात समाजावर संस्कार करण्याचे काम मीडिया करत असतो. त्यामुळेच मीडिया चा ह्या सर्वात खूप महत्वाचा रोल आहे.
स्त्रीवर्गाची स्वतःबद्दलची मानसिकता आणि पुरुषांची स्त्रियांबद्दलची मानसिकता घडवण्याचे दुर्दैवाने बिघडवण्याकडेच आज मीडियाचा कल दिसतोय.गोरा रंग या एकाच निकषावर स्त्रीचे सौंदर्य मोजून तिचे स्वत्व,कर्तृत्व,गुण,शारीरिक मानसिक बौद्धिक क्षमता या सगळ्या गोष्टी फुटकळ ठरवण्याचे काम आज मीडिया करताना दिसते.तुमचा रंग सावळा, निमगोरा ,गव्हाळ किंवा काळा असूच शकत नाही का?. क्रीम लावून गोरे झाला नाहीत तर नोकरी मिळणार नाही, नवरा मुलगा नकार देणार, गर्लफ्रेंड दुसऱ्याबरोबर गाडीवर निघून जाणार इतक्या खालच्या दर्जाच्या जाहिराती आज आपण रोज शांतपणे बघतोय. कारण आपण या गोष्टीचा स्वीकार केलाय.किशोरवयीन बदलांना सामोरे जाणारी तरुण पिढी,भविष्यकाळाची अनिश्चितता,सारासार विचार करण्याइतपत न आलेली maturityविरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दलचे वाटणारे आकर्षण, व्यसनाधीनता याबरोबरच गोरेपणा चा दबाव यामुळे सहज या विचारांना बळी पडते.
एखाद्या अतिशय संवेदनशील चित्रपटातील आवश्यक आणि अतिसंवेदनशील सीन सेन्सॉरच्या नावाखाली कापला जातो आणि या अतिसुमार दर्जाच्या जाहिराती ज्या आज समाजातील स्त्रीचे इतके बीभत्स चित्रण, प्रतिमा तयार करताय ते आपण रोज कुटुंबासोबत बसून बघतोय. का ?कॉर्पोरेट स्ट्रॅटजी आणि मिलियन डॉलर मार्केट! या जायंट इंडस्ट्रीचा मीडियावरील आर्थिक होल्ड इतका आहे कि समाजाच्या मनाचे,सारासार बुद्धीचे,नैतिकतेचे स्वास्थ्य जपणे ,वाढवणे हा उद्देष असलेले वृत्तपत्र, दूरचित्रवाणी, चित्रपट,साहित्य आज कस्टमर base तयार करताय. समाजप्रबोधन हे मीडिया चे ध्येय मीडिया साफ विसरत चाललीये.मीडिया ने रुजवेलेले सौंदर्याचे निकष आणि स्त्रीची चुकीची इमेज हि आज तरुण पुरुष वर्गाची स्त्रीबद्दलची अतिशय भयानक आणि चुकीची मानसिकता, त्यातून होणारे परिणाम, गुन्हे इतपत गंभीर आहे, याचा आपण कधी विचार करतो का? एक गोरेपणाची जाहिरात वेगवगेळ्या समाजातील घटकांवर किती विपरीत परिणाम करू शकते. सावळा, काळा रंग असलेल्या मुलींना स्वतःला स्वीकारून ह्या सगळ्या चुकीच्या रूढ प्रवाहाविरुद्ध जायला किती त्रास होत असेल ह्याची कल्पना न केलेलीच बरी. तर सौंदर्य क्षेत्र आणि मीडिया यांचा हा असा संबंध आहे.
आता या सगळ्यात आयुर्वेद कसा आला ?
सर्वप्रथम काही गोष्टी स्पष्ट करूयात. आयुर्वेदात गोरा रंग इत्यादी ला अजिबात महत्व दिले नाही. गोरा रंग होण्याचे नुसखे हे आयुर्वेद नाही सांगत. ते आयुर्वेदाच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करणारे सांगत असावेत.आयुर्वेदात वर्ण म्हणजे रंग याचा उल्लेख प्राकृत म्हणजे नॉर्मल आणि अप्राकृत म्हणजे ऍबनॉर्मल असा आलाय. त्वचेच्या आरोग्याचे आणि काळ्या गोऱ्या व इतर रंगाचे वर्णन प्रकृती, वेगवेगळ्या धांतूंची सारता किंवा एखाद्या व्याधीत मनुष्याच्या रंग कसा फिकट, पांढरा, पिवळा इत्यादी होतो असे काही उल्लेख आहेत.आणि त्या अनुषंगाने काय उपाय करावे म्हणजे मनुष्याचा पूर्वीचा रंग व्याधी जाऊन परत येईल असे होय. त्वचेचे विकार आणि आरोग्य हा विषय आयुर्वेद उत्तमपणे निश्चित हाताळतो परंतु त्वचेला गोरे करणे असा कुठेही उल्लेख नाही. त्वचेच्या आरोग्याकरिता आहार, विहार आणि औषधी अशी योजना वर्णन केली आहे. सहा आठवड्यांचे fairness क्रीम हि आयुर्वेदाची नीती नव्हे .
परंतु सौदर्य वर्धक उत्पादनांमध्ये वापरलेल्या रसायनांचे जसजसे गंभीर side effects दिसायला लागले तसतसे अपायरहित आयुर्वेदाची मदत किंबहुना कुबडी या कंपन्याना घ्यावी लागली. आणि मग सुरु झाला हर्बल क्रीम चा प्रवास.आधी काय कुंकुमादी तेल युक्त, मग काय केसर,आता काय मोती युक्त ,मग काय सोने युक्त आणि तो वाढतोय आणि आपण खऱ्या अर्थाने व्हिक्टिम बनतोय.हर्बल बिरबल हा माझा हर्बल उत्पादनांवर प्रकाश टाकणारा लेख मी मागेच सविस्तर लिहलाय तेंव्हा इथे विस्तृत लिहीत नाही.वर्डप्रेस वर अवश्य वाचा.
तर गोरा रंग म्हणजे सौंदर्य अशी ठरवून केली गेलेली चुकीची व्याख्या ,मीडियाला हाताशी धरून तिला अजून खतपाणी आणि त्यामुळे स्त्रीवर्गाचे झालेले कायमचे न भरून येणारे नुकसान आणि या सगळ्यात सोयीस्कर वापरलेले गेलेले आयुर्वेद शास्त्र हे सगळं फक्त आणि फक्त व्यवसाय आणि त्याच्याशी संबंधित खेळींचा भाग आहे.
माझा वाचकवर्ग सौंदर्याची अशी चुकीची व्याख्या यापुढे कधीच स्वीकारणार आणि अशी मला खात्री आहे. हा लेख समाजात एक लहानसा का होईना पण चांगला बदल घडवेल अशी प्रामाणिक इच्छा!
खरच ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, भारतीयांना आधीच आयुर्वेदाबद्दल एक विलक्षण कुतूहल आणि विश्वास आहे. त्या विश्वासाचा गैरफायदा हे मार्केटिंग स्ट्रेटजिस्ट घेत आहेत. सर्वात आधी वर्ण भेद संपवायला हवा. आपला लेख त्या संदर्भात प्रामाणिक प्रयत्न करतो. आजतागयत अशी अनोखी मांडणी मी नाही पाहिली. कांती गोरी तर कशाचीच होत नाही, पण ती उजळविता येते ती उत्तम आहाराने आणि भरपूर जल सेवनाने याची जागृता पण तितकीच महत्वाची. आपले ब्लॉग्स स्तुत्य आणि तितकेच उपयुक्त असतात. मी तुमचा नियमित वाचक आहे. 👍
LikeLike
अतिशय उत्तम विवेचन
LikeLike
Khup uttam vivaran ani satya paristhiti mandanyacha 1 dolas prayatnna.
LikeLike
छान लेख
अजुन अपेक्षा वाढवणारा लेख
अभिनंदन रूपालिजी
LikeLike
on one hand youth is changing culturally but on the other hand is running after cosmetics . this is surprising .
LikeLike
An enlightening article madam. Thank you.
LikeLike
Sundar…
Gorepanachya vyakhyebaddal ani sundartebaddalchi mate pharach sundar …!
Lokancha drushtikon badlayla hava!
Chhan muddesud ani marmik lekh…🙂
LikeLike
Good one.Nice info in short.
LikeLike
सौंदर्य ची व्याख्या मस्त आहे.
खूप छान लिहिले.
LikeLike
उत्तम आणि मुद्देसूद लेखन.
यातील मुद्दे खरोखर विचार करण्यासारखे आहेत.
मुळात सावळा किंवा निमगोरा वर्ण असणाऱ्यांना inferiority कॉम्प्लेक्स दिला जातो आपल्या समाजात त्यामुळे लोकांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे पण त्या ऐवजी मीडिया गोरे लोक कसे यशस्वी होतात याचे जाहिरात बाजी करते हे चुकीचे आहे आणि त्यात पुन्हा आयुर्वेदाचे नाव घेऊन त्या बद्दल हि चुकीच्या समजुती ना खत पाणी दिले जाते .
माणसाचा वर्ण हा देश…काळ ..प्रकृती नुसार वेगवेगळा च असतो .
LikeLike
Best Blog… Khooopach chaan ….
LikeLike