मायेची नाळ: बाळाची पहिली लाईफलाईन !

मायेची नाळ: बाळाची पहिली लाईफलाईन !
राष्ट्रीय पोषण सप्ताह :
लेख क्रमांक १.

umbilical chord.jpg
पोषण हा शब्द आता इथे लिहिताना पहिली गोष्ट डोळ्यासमोर आली ती म्हणजे आई आणि बाळातील सर्वात महत्वाचा दुवा, पोषणाची पहिली शक्यता ,नाळ!
होय नाळ जोडली जाणे इथेच अजून जन्मालाही न आलेल्या बाळाची पोषण कथा सुरु होते.हि नाळ बाळाच्या शरीराला व मनाला आईकडून हवे ते सर्व पोषण पुरवून आईच्या शरीराबाहेर राहण्याकरिता सुसज्ज बनवणार असते.
म्हणजेच आईचे पोषण उत्तम तर बाळ सुदृढ हे साधे समीकरण खूप महत्वाचे आहे.त्यामुळे पोषणसप्ताहकारिता लिहल्या जाणाऱ्या ह्या लेखमालेकरिता गर्भिणी मातेचे पोषण हाच पहिला लेख हवा हे अगदी ओघाने आलेच.
पोषण याचा अर्थ नुसती वाढ किंवा खूप व्हिटॅमिन मिळणे हा नक्कीच अपेक्षित नाही. अतिपोषण आणि अल्पपोषण हे दोन्हीही कुपोषण च आहेत. एकीकडे दिवस राहिल्या राहिल्या पचनशक्ती,गरज इत्यादींचा विचार न करता दर तासाला पोटावर खाद्यपदार्थांचा भडीमार करणेही वाईट आणि केवळ ज्ञानाचा माहितीचा अभाव, परिस्थिती यामुळे कमी पोषक आहार सेवन करणे हेही दुःखदच होय!

दिवस राहिल्यांनंतर येणाऱ्या ९ महिन्यात बाळाच्या एक एक पेशी तयार होणार असतात. ह्या पेशींपासून वेगवेगळे अवयव आणि वेगवगेळ्या गुंतागुंतीच्या क्रिया सुरु होतात.प्रत्येक महिन्यात विशिष्ट पोषणाची गरज जर भागवली गेली तर गर्भाला देखील उत्तम पोषण मिळते.आयुर्वेदामध्ये प्रत्येक महिन्यात आहारात अवश्य असाव्यात अशा काही गोष्टींचा ठळक उल्लेख आहे. तोच थोडक्यात बघुयात.

  • पहिला महिना :ज्या महिन्यात गर्भधारणा अपेक्षित आहे त्या महिन्यात गार दूध वरचेवर घ्यावे.
  • दुसरा महिना: शतावरी,ज्येष्ठमध,मनुका अंजीर दुधात उकळवून ते दूध घ्यावे.
  • तिसरा महिना:ह्या महिन्यात दुधामध्ये मध आणि तूप वेगवगेळ्या प्रमाणात मिसळून ते दूध पिण्यात ठेवावे.
  • चवथा महिना: बाळाच्या हृदयाच्या वाढीस पूरक असे लोणी आहारात भरपूर असावे.तसेच तूप आणि गायीच्या दुधाचे पदार्थ खावेत.
  • पाचवा महिना:तुपाचे प्रमाण या महिन्यात उत्तम असणे आवश्यक
  • सहावा महिना:वरीलप्रमाणेच दूध वेगवेगळ्या पदार्थांबरोबर उकळवून प्यावे.
  • सातवा महिना: ह्या काळात स्त्रीला जळजळणे अपचन अश्या तक्रारी उद्भवू शकतात. त्याकरिता वरील मधुर थंड द्रव्यांनी उकळवलेले दूध तूप द्यावे.
  • आठवा महिना :ह्या महिन्यात वेगवगेळ्या डाळी आणि कडधान्यांच्या कढणामध्ये भरपूर तूप टाकून ते प्यायला द्यावे.

नववा महिना :वरीलप्रमाणेच आहार ठेवावा.
बाकीच्या नेहमीच्या आहाराबरोबर दूध तूप लोणी यांचे महत्व वरील टीपांमध्ये अधोरेखित होतेच.याखेरीज बाकीचा आहार देखील ९ महिन्यात सकस असा ठेवावा.
वरील आहारास ‘मासानुमासिक आहार’ (मंथली डाएट) असे नाव होय.
आवर्जून खावे असे पदार्थ :
सुका मेवा,ताजी फळे, तांदुळाची गव्हाची खीर, कणकेचा प्रसादासारखा शिरा,मुगाचे कढण,गुळाची चिक्की,दूध लोणी तूप ,मांसाहारी व्यक्तींमध्ये घरी तयार केलेले नॉन veg सूप, लाल भोपळा ,कोहळा,राजगिरा,लाल माठ, मऊ भात तूप, कोकम सार या विशिष्ट पदार्थांखेरीज इतर आहार चौरस असावा.
अधिक आयुर्वेदिक आहार मार्गदर्शन योग्य वैद्याकडून अवश्य घ्यावे
कायम टाळावे असे पदार्थ:
शिळे, तयार पाकिटबंद, कृत्रिम रंग चवीचा बहादुर असणारे पदार्थ.
चिप्स, रस्त्यावरील उघडे जसे पाणी पुरी,भेळ,सामोसा,जूस इत्यादी.
रेडी to ईट पदार्थ,सोडा, मद्यपान,धूम्रपान,
चमचमीत लोणचे,खारवलेले पदार्थ.
आईस्क्रीम खाल्ले कि बाळ गोरे होते असा अद्भुत अभिनव शोध मी ऐकला होता एवढ्यातच, तथ्य असू दे बाजूला परंतु आजकाल मिळणाऱ्या आईस्क्रीम मध्ये दूध नसते हे जरी लक्षात आले तरी खूप. अशा आईस्क्रीम पासून दूर राहा.विश्वासातील ठिकाणाहून थोड्या प्रमाणात जरूर खावे.
पोटास तडस लागेपर्यंत खाऊ नये, हलक्या मात्रेत भूक लागेल तसा आहार घ्यावा,जागरण अजिबात करू नये,पुरेशी झोप देखील आवश्यक आहे
डॉक्टरांशी नियमित भेट आणि दिलेली औषधे योग्य तर्हेने घेणे देखील पोषणासाठी आवश्यक च होय.
अशा सध्या गोष्टी देखील गर्भाच्या पोषण दृष्टीने भक्कम पायाच ठरतात.
लेख सुटसुटीत राहावा याकरिता लेखन आटोपते.
उद्याच्या लेखात ‘बाळाचा पहिला खाऊ’ म्हणजे स्तन्य, आई चे दूध आणि बाळाचे पोषण याविषयी जाणून घेऊ.
लेखिका: डॉ.रुपाली पानसे
आद्यं आयुर्वेद क्लीनिक, बाणेर पाषाण लिंक रोड, पुणे
दूरध्वनी: ९६२३४४८७९८

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s