व्याधिप्रतिकार क्षमत्व वाढवण्यासाठी आयुष ह्या भारतातील महत्वाच्या संघटनेने अगदी सोपे घरातील डब्या डब्यात आढळणारे स्वैपाकघरातील घटकद्रव्ये वापरून एक फॉर्मुला सामान्य लोकांसाठी पुढे आणला.
कुठलेही क्लिष्ट नाव नाही, कुठलेही महागडे फॉर्मुलेशन नाही , गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वाना च सहज नेहमी करता येईल एवढी आपलीशी स्वस्त घटकद्रव्ये. सुशिक्षित अशिक्षित ,अगदी कुणीही सहज करू शकले अशी चहासारखी साधी पाककृती.
साहजिक च अनेक भुवया उंचावल्या. बऱ्याच जणांनी हे काय मसाला चहा आहे कि काय ? असा उपहास हि केला. एखादे करोना वरचे औषध शोधायचे सोडून हा काय घरगुती काढा असेही बऱ्याच जणांनी बोलून दाखवले. त्या सर्वांसाठी आजचा ‘काढा प्रपंच’!

आयुर्वेदामध्ये औषधी प्रकारांमध्ये क्वाथ म्हणजेच ताजा काढा हा वनस्पतींच्या ताज्या रसाखालील उत्तम औषधी प्रकार मानला जातो. नंतर मग वाळवलेले काष्ठ, चूर्ण गोळ्या आणि आसवं अरिष्ट !
पाण्यामध्ये मंद अग्नीवर झाकण न ठेवता काढा उकळला जातो . म्हणजे औषधी वनस्पती मधील कार्यकारी द्रव्य त्वरित त्यात उतरतात. काढ्याकरिता पूर्वी मातीचे भांडे chemically netrual म्हणून उत्तम समजले जायचे. आता मातीचे नसेल तर स्टील अथवा काचेचे भांडे उत्तम . काढा उकळवायला microwave चा वापर आपण निश्चित करणार नाही असे मी गृहीत धरते. आता या काढयातील घटकद्रव्ये शरीरात जाऊन काय काय करू शकतात ते बघू.
तुळस: घराघरात प्रवेशद्वारापासूनच सूक्ष्म जीवांपासून संरक्षण करणारी हि निन्जा वनस्पती ज्वर नाशक, कृमीनाशनक(antimicrobial ), वेदनाहर आहे.श्वसन संस्थेतील वायूंचं व्याधींवर तुळस उत्तम औषधी होय.
काळे मिरे : काळे मिरे उत्तम ज्वरनाशक(अँटिपायरेटिक),रोग प्रतिकारक पेशींना उतेजन देणारे आणि अँटिऑक्सिडेन्ट होय. त्यामधील पायपेरीन हे कार्यकारी द्रव्य बऱ्याच प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे होणाऱ्या व्याधींवर उत्तम कार्य करते. काळे मिरे हे प्रत्येक पेशींच्या स्तरावरील पचनाला उत्तेजना देते त्यामुळे सूक्ष्म पचन ज्याला आपण मेटाबोलिसम म्हणतो ते उत्तम राहते. काळ्या मिर्यांचा श्वास घेण्यास त्रास होणे, कफामुळे होणारे फुफुसांचे व्याधी , अस्थमा , नाकाचे व्याधी यावर उत्तम कार्य होते. अनेक allergy असणाऱ्या लक्षणावर देखील काळेमिरे उत्तम कार्य करतात. शरीरातील चयापचयामुळे निर्माण झालेलं अनेक विषार(टॉक्सिन)DNA ला अपाय करू शकतात. जनुकांवरील हे आघात कायम होत राहिल्यास अनेक तर्हेचे ऍलर्जी आणि कॅन्सर यासारखे गंभीर व्याधी होऊ शकतात. त्यामुळे अनेक आयुर्वेदिक औषधींमध्ये मिरे हे अवश्यमभावी घटक असते.
दालचिनी: उत्तम सुंगध असलेले हे मसालाद्रव्य कफनाशक आहे. आधुनिक निकषांवर दालचिनी हे antitumorogenic म्हणजे कॅन्सर सारख्या अपायकारक पेशींच्या असामान्य वाढीला विरोध करणारे द्रव्य आहे . दालचिनी मधील सुंगधी तैलद्रव्य हे दीपन म्हणजे भूक वाढविणारे तसेच सूक्ष्मातिसूक्ष्म पचनास उतेजन देणारे होय.शरीरामधील पेशींची सूज दाह कमी करण्याखेरीज रक्तातील साखरेचे नियंत्रित करणारा गुण देखील दालचिनी त आढळतो.
सुंठ : वाळवलेल्या आल्याच्या ह्या स्वरूपात जिन्गेरोल हा कार्यकारी द्रव्याचे कार्मुकत्व अनेक आजारांवर सिद्ध झालेले आहे. साध्या अपचनापासून ज्वर , पोटाचे विविध इन्फेक्शन आमवात या सारख्या व व्याधिप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होणाऱ्या अगणित व्याधी वर सुंठ गुणकारी होय. श्वसनसंस्थेपासून प्रजनन संस्थेपर्यंत अनेक व्याधी एकटा सुंठ सांभाळू शकेल इतका तो समर्थ होय. शरीरात जमा होणारे विषार वेळेत च नष्ट होणे अथवा बाहेर टाकले जाणे महत्वाचे असते . हे काम नियमित सुंठ घेतल्याने उत्तम पार पडते.
काळ्या मनुका : सर्व फळांमध्ये अतिउत्तम म्हणून काळ्या मनुकांचा उल्लेख आयुर्वेदात आहे. पित्त , कफ आणि वात तिन्ही दोषांना गोंजारून त्यांचे उत्तम गुण अधिक चांगले रीतीने प्रकट करणे हे मनुकेचे वैशिष्ट्य. प्रतिकारक्षमता रक्त धातूच्या अधिपत्याखाली असते.ह्या रक्त धातूतील लोहकण वाढवणे रक्तकणांची उत्तम निर्मिती मनुकेने साधली जाते. त्यामुळे प्रतिकारक्षमता उत्तम राहते. मनुकेतील बियांमधील तैलद्रव्ये हि रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढवते. सर्व आजारांमधील अशक्तता, धातूंची झीज भरून व्याधी अवस्थेतून लवकर स्वस्थ होण्यासाठी मनुका उत्तम आहारद्रव्य तसेच औषधी होय.
दिलेले गुणधर्म थोडक्यात सांगितले आहेत. ह्या सर्व वनस्पतींवर शेकडो संशोधने आपणास पाहावयास मिळतील. कृत्रिम रासायनिक जीवनसत्वे तसेच पचायला जड प्रोटीन पावडर व इतर औषधी प्रतिकारक्षमतेसाठी घेण्यापेक्षा हि घरातील समृद्ध आयुर्वेद परंपरा नियमित आत्मसात करणे अधिक वैज्ञानिक होय.
Nice information
LikeLiked by 1 person
सर्व सामान्यांना उपयुक्त माहिती 👌👌👍
LikeLiked by 1 person
खूपच छान. अगदी साध्या सोप्या शब्दांत किती छान माहिती दिलीत आपण डॉक्टर.
धन्यवाद.
LikeLiked by 1 person
Can this be available in English?
LikeLike
https://drrupalipanse.wordpress.com/2020/05/05/a-cup-of-kadha-herbal-tea-can-keep-a-doctor-away/
LikeLiked by 1 person
Thank you maam ,khup chan mahitipar lekh ahe .
LikeLike