One query : Diet and bone health!

रविवार ब्लॉग्स च्या नियमित वाचकांचा लेखांवर आवर्जून प्रतिसाद येत असतो. लेखातील विषयावर किंवा त्या संबंधित इतर पैलूंवर वाचकांकडून प्रश्न, शंका आणि अनुभव देखील सतत पोचत असतात. हे प्रश्न शंका आणि त्याची उत्तरे इतरही वाचकांना उपयोगी पडतील असा एक विचार येऊन काही ब्लॉग्स हे वाचकांच्या शंका आणि त्यांची उत्तरे असे ठेवले तर ?
आजचा ब्लॉग हा देखील असाच एका महिला वाचकाची शंका आणि त्याचे उत्तर होय.

मला दूध आणि दुधाच्या व्यंजनाची ऍलर्जी आहे.माझ्या उतारवयात हाडांच्या स्वास्थ्याची काळजी आहारातून कशी घेतली जावी ? वाचक/स्त्री/वय वर्षे ५०कोलकता.
उत्तर: हाडांची घनता स्वास्थ्य टिकवून ठेवण्यास दुधाव्यतिरिक्त आहारामध्ये इतरही पदार्थ उपयोगी होत.सर्व प्रकारच्या डाळी,नीट शिजवलेले हिरवे मूग आणि इतर कडधान्ये यातून प्रथिने आणि कॅल्शियम चा भरपूर पुरवठा होतो.खारीक,खोबरे,अहळीव,बदाम, सुके अंजीर,अक्रोड ,मेथ्या,बिब्बा मगज,जर्दाळू हे सर्व हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत.याचे साजूक तुपातील गुळ घालून लाडू किंवा नुसतीच पूड करून रोज ४ ते ५ चमचे खाल्ली तरी चालते.साजूक खाण्यात खाण्यात नक्कीच असावे.
राजगिरा लाह्या देखील खाण्यात असाव्यात.तसेच गुळाची दाण्याची,खोबऱ्याची,तिळाची चिक्की हि अधून मधून खाणे उत्तम.
गहू,नाचणी,बाजरी ज्वारी यासारखे धान्य खाण्यात वेगवगेळ्या स्वरूपात असणे योग्य. आपण बंगाली असून बंगाल मध्येच राहतात. आपल्या खाण्यातील मासे तसेच इतर मांसाहार देखील हि गरज पूर्ण करण्यास उत्तमच होय.मासे तळून खाण्यापेक्षा केळीच्या पानात वाफवून खाणे जास्त योग्य आहे. तसेच मासे आणि विरुद्धान्न याबाबत असलेले नियम नक्की लक्षात ठेवा.
आहाराव्यतिरिक्त हाडांच्या स्वास्थ्यासाठी नियमित व्यायाम, संधीची व संधिबंधांची लवचिकता राखणे महत्वाचे आहे.शरीराला नियमित तिळाचे तेलाने मालिश आणि आयुर्वेदातील बस्ती सारखे चिकित्सा प्रकार तर या वयात नक्कीच आवश्यक होत.
हाडे आणि कॅल्शिअम इतके साधे समीकरण नक्कीच नसते. हाडे ज्याला आयुर्वेदात अस्थी धातू म्हणतात तर या अस्थी धातूचे स्वास्थ्य उत्तम असेल तर सांधे बळकट राहतात. कॅल्शिअम व्यतिरिक्त सांध्याच्या ठिकाणचे वंगण म्हणजे कुर्च्यामधील स्निघ द्रव प्राकृत राहणे आवश्यक होय.तसेच अस्थी आणि वात हा संबंध विसरून चालणार नाही. अस्थी आणि संधी म्हणजे च सांध्याच्या जागी कोरडेपणा आला कि ते कुरकुर करतात.त्यामुळे तेथील स्निग्धांश जपणे आवश्यक होय.त्या करिता पोटातून तेल तुपाच्या स्वरूपात आणि बाहेरून तेलाचं मालिश नियमित असणे फायदेशीर ठरते.नेमके उतारवयात लोक तेलतुपाला वाईट म्हणून वाळीत टाकतात.असे निश्चित टाळावे.काही व्यक्तींमध्ये सल्ल्यानुसार एरंड तेलाचे अल्प मात्रेत सेवन देखील संधिदुखी करता उत्तम उपाय ठरू शकते.
आहार विहारातील या साध्या गोष्टी हाडे आणि सांधे यांच्या बाळकटीकरिता पाळणे निश्चित उत्तम!

Share this :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart