जागतिकीकरण आणि आयुर्वेदिक सिद्धांताची शाश्वतता:
दवाखान्यात येणारे बरेच पेशंट किंवा परिचित, नातेवाईक तुमच्या आयुर्वेदात पनीर सांगितलेय का, कँसर होता का असे प्रश्न विचारतात. किंवा हजारो वर्षापूर्वीचे आयुर्वेदिक सिद्धांत आज या अत्याधुनिक युगात कसे वापरले जाऊ शकतात किंवा व्हॅलिड होतात का ?अशाही शंका येतात. साहजिक त्या येणे अपेक्षित आहे किंबहुना यायलाच हव्या .
आज जग बदलले, अफाट अचाट विकसित झाले तरी हजारो वर्षापूर्वीचे आयुर्वेदिक सिद्धांत टिकून आहेत. कारण शरीरक्रियाशास्त्र ,शरीररचना शास्त्र,रोगनिदान शास्त्र आणि चिकित्सा शास्त्र यातील मूळ गाभा तोच आहे. मनुष्याच्या शरीरात मेंदू मेंदूच्याच ठिकाणी, तर हाडे हि मनुष्याप्रमाणेच तेवढीच आणि तिथेच आहेत.
आधुनिक वैद्यक क्षेत्रात झालेली आणि होत असलेली अफाट प्रगती हा आरोग्य सेवेतील अवश्यमभावी भाग होय. सतत भर आणि सुधारणा हा कुठल्याही प्रांतातील यशाची एक ओळीतील गुरुकिल्ली होय.आधुनिक वैद्यकातील शोध,संशोधने हि चिकित्साशास्त्राला अनुकूल ठरावी अशी खरे तर अपेक्षा .परंतु शास्त्राची प्रगती आणि चिकित्सा परिणाम बरेचदा समतोल साधत नाही.
वैद्यकीय प्रांतातील अबब प्रगतीला आणि संशोधनाला कुठेतरी काही व्याधी,काही असाध्य आजार हे दुर्दैवाने वेसण घालताना दिसतात.प्रत्यक्ष प्रमाणावर तंतोतंत सिद्ध झालेल्या गोष्टी बरेचदा कृतीतून मात्र हवे ते परिणाम साधत नाही.जीवनशैली ,आहारशैली यामुळे होणारे व्याधी याचे चपखल उदाहरण म्हणता येईल.आजमितीला जगभरात सर्वात जास्त संशोधन,प्रयोग आणि पैसे कुठे गुंतवले जात असतील तर ते अयोग्य जीवनशैली ,आहारशैली मुळे होणारे लाइफस्टाइल डिसीस,स्वतःच्या शरीरावरच उलटलेली रोग प्रतिकारक शक्ती ज्याला इंग्रजीत ओटॉइम्म्युन व्याधी म्हणतात आणि अनुवांशिक व्याधी यांमध्ये होय.
यावरून आरोग्य आणि व्याधी चा विचार करताना फक्त जिवाणू विषाणू,इन्फेकशन आणि वेदनाशमन याही पलीकडे जाऊन मनुषय शरीरातील बऱ्याच शरीर रचना आणि शरीर क्रियांचा व्यापक अंगाने विचार करणे क्रमप्राप्त होते.
भारतात पाश्चिमात्य वैद्यकीय शास्त्राबरोबर शेकडो वर्षे आधीच अस्तित्वात असलेली आयुर्वेद हि वैद्यकीय शाखा हि आज जगमान्य आहे.आयुर्वेद शास्त्रातील औषधी,पंचकर्म आणि इतर चिकित्सातत्वे आजच्या घडीला कसोटीस उतरताय.आणि वैद्यकीय क्षेत्रात आधी न झालेली गोष्ट आता घडतेय. ती म्हणजे प्राचीन वैद्यक शास्त्रातील थेरी किंवा सिद्धांत पुन्हा अभ्यासले जाऊन त्याचा वर्तमानातील वैद्यकीय क्षेत्रात सकारात्मक वापर कसा करता येईल यासाठी बौद्धिक गुंतवणूक!
आयुर्वेद शास्त्र हजारो वर्षांपूर्वी अभ्यासले गेले, प्रत्यक्ष प्रमाणावरील अनुभवातून, आप्तवचन तसेच कार्यकारणभाव सिध्दांतातून विकसित होऊन चरकादि विविध ग्रंथात परिणत झाले.
आयुर्वेदाचा पाया फक्त व्याधी आणि चिकित्सा यावर उभा नाही हे आयुर्वेदाचे खरे यश आहे.मनुष्य आणि त्याच्या शरीर मानस भावांशी निगडित सर्व सजीव निर्जीव तत्वांची खोल दखल,त्यांचा मनुष्य आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आणि या सगळ्यातून मनुष्य शरीर आणि मानस आरोग्यासाठीचे एकत्रित सिद्धांत आणि चिकित्साप्रणाली असे आयुर्वेदाचे स्वरूप आहे.
भाषा,निदानासाठीचे आधुनिक यंत्र आणि तंत्रज्ञान ,शस्त्रक्रिया यासारख्या क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले.वैद्यकीय क्षेत्र सर्वांगाने उन्नत झाले. मनुष्य आणि त्याच्या शारीरिक मानसिक आरोग्याचे मूळ पूर्वी होते तेच आहे.
जागतिकीकरणामुळे आलेल्या आहारक्रांतीत आहाराचे मूळ स्वरूपच बदलले गेले. परंतु आयुर्वेद संहितांमध्ये अशा आहाराचे आधीच वर्णन केले गेले आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास आज प्रगत समजल्या जाणाऱ्या आहार औद्योगिक क्षेत्रात खारवलेले,(सॉल्टी),टिकवलेले (preserved )(थोडक्यात शिळे),संकरित genetically modified ,(देश,प्रकृती निसर्ग विरुद्ध) असे अन्न सर्वात जास्त खाल्ल्या जातेय.
अशा आहारापासून होणारे व्याधीचे वर्णन आहार विषयीचे वर्णन करताना आलेले आहे. आज परत आधुनिक आहारशास्त्र खूप संशोधन च्या आधारे आणि असंख्य प्रबंध आणि रिसर्च पेपर्स द्वारे तेच सांगतेय कि असे पदार्थ हे आहारजनीत व्याधीचे मूळ आहे. retrospective जर्नी दुसरे काय.
तसेच रेड मीट मध्ये असलेल्या Neug5c ह्या विशिष्ट साखरेच्या रेणू मूळे तो साखरेच रेणू पचवला जात नाही ,तसेच रेड मीट च्या अतिसेवनाने कँसर,ओबेसिटी,डायबेटीस,इम्म्युनिटी चे इतर आजार होतात असे सिद्ध झालेय.
आयुर्वेदात नेहमी टाळावे असे पदार्थांचे वर्णन करताना चरकसंहिता आणि इतर आयुर्वेदिक ग्रंथात वराह(पोर्क),गाय,म्हैस असे लाल मांस असलेले पदार्थ टाळावे किंवा ते सगळ्यांनाच पचवता येत नाही म्हणून जपून खावे असा स्पष्ट उल्लेख आहे. गुरु गुण आणि अग्नी याचा संबंध याची पुष्टी देतो.
हि उदाहरणे परत प्रातिनिधिक होत. अशी असंख्य उदाहरणे देता येतील.
जागतिकीकरणाने झालेले पर्यावरणातील बदल हि विविध व्याधींना कारणीभूत होताय. अशा वेळेस आयुर्वेदातील दिनचर्या,ऋतुचर्या पालन हे खूप आवश्यक ठरते.
आयुर्वेदीय मूळ सिद्धांतांचा जास्त उपयोग खरेतर जागतिकीकरणानंतर आज करता येईल.कारण व्याधींचे स्वरूप वेगळे असले तर शरीरातील मूळ दोष धातू सिद्धांत ह्या नवीन व्याधींचे निदान आणि चिकित्सा करायला उपयोगी ठरतात.
त्यामुळे आधुनिकीकरण आणि सिद्धांत हे दोन वेगवेगळी टोक आहे. आजचे प्रगत हे उद्याचे प्राचीन होणार यात शंका नाही.परंतु शरीर,आहार आणि चिकित्सा शास्त्राचे हे सिद्धांत शाश्वतच राहणार हे निश्चित!
वरील माहीती वाचली खुपच छान आहे आयुर्वेद ही प्राचीन पासुन धन्वतरी असल्याने आजही लोकाचा आेढा आयुर्वेदाकडे आहे आपल्या कार्यास शुभेच्छा सेवलीकर
गहू, त्यातलं ग्लूटेन हा विषय सध्रया गाजतोय. एकंदरित ग्लूटेन आणि हल्ली मिळणारं दूध याविषयी लिहावे.