दुर्लक्ष आणि संकोच ! मृत्यूस आमंत्रण!
उशिरा झालेले निदान हे आज भारतात स्तनाच्या कर्करोगामुळे (कॅन्सर) झालेल्या महिला रुग्णांच्या मृत्यूचे मुख्य कारण आहे. स्तनांच्या कर्करोगाचे (कॅन्सर) लवकरात लवकर झालेले निदान हे पेशंट चा जिव वाचवण्यासाठी तसेच उपचारांची उपयुक्तता वाढविण्यात मोलाचे असते.सद्य उपलब्ध आणि सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या प्रचलित निदान प्रकारांमध्ये कर्करोग (कॅन्सर) झाल्यावर तो झाला आहे हे कळते.परंतु जर कॅन्सर होण्याचे आधीच शरीरातील सूक्ष्म अतिसूक्ष्म बदल लक्षात आले तर?
थर्मोग्राफी हे असेच निदान करण्याचे अद्ययावत प्रगत साधन आहे.शरीरातील सुक्ष्म रक्तवाहिन्यांच्या आणि तापमानाच्या बदलावरुन व्याधीचे निदान अशी संकल्पना असलेले हे निदान वैद्यकीय आणि निदान क्षेत्रात एक नवीन आशा आहे.जगभरात संशोधन सुरू असलेल्या थर्माग्राफी निदान प्रकारची *महाराष्ट्रातील पहिली अधिकृत शाखा नाशिक येथे सुरू झाली आहे.
. पेशंट च्या शरीरापासून दूर,स्पर्शरहीत, वेदनारहित, हानिकारक \’क्ष\’ किरणविरहीत आणि अतिशय माफक दर असलेली हि तपासणी महिला वर्गाने स्वत:करिता करावीच करावी.प्रत्येक महिला हि स्तनाच्या कॅन्सर बाबतीत जागरूक असणे हे त्या महिलेबरोबरच तिच्या आजूबाजूच्या लोकांचे किंबहुना संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे.
वयाच्या पस्तिशी ओलांडलेल्या सगळ्या स्त्रिया तसेच कुटुंबात कॅन्सर ची history असलेल्या अशा सगळ्यांनाच ही तपासणी आवश्यक होय.
ही तपासणी फक्त स्त्रियांसाठी नाही कारण
स्तनांच्या कॅन्सर व्यतिरिक्त अनेक आजार जसे रक्ताच्या गुठळ्या , एखाद्या ठिकाणचा रक्तप्रवाह वाढणे अथवा कमी होणे,आंतरिक अवयवाची सूज, दाह , इत्यादी निदान ह्या तपासणीत होऊ शकते. अनेक व्याधी लवकर निदान झाल्यामुळे रोखल्या जाऊ शकतात अथवा त्यावरील उपचार त्वरित केले जाऊ शकतात. त्यामुळे पुरुष आणि स्त्रिया यांनी अवश्य लाभ घ्यावा
अधिक माहिती अवश्य जाणून घ्या
तपासणी साठी संपर्क.
फोन नंबर : 7709108996, 8793088080
आजच विनासंकोच फोन करून अधिक माहिती मिळवा !
*सर्वत्र: सुखिना संतू , सर्वे संतू निरामय:!*