skip to content

Gut: The second brain in body!

आतडे: शरीरातील दुसरा मेंदू !!!!

आपल्या शरीरात दोन दोन मेंदू आहे असे मी तुम्हाला म्हंटले तर ? किंवा आतड्याला देखील स्वतःचे मन असते असे म्हंटले तर ?
‘बटरफ्लाईज इन माय स्टमक’, ‘पोटात गलबलून आले’ ,’पोटात भीतीचा गोळा येणे’ ,ताण असताना एन्झायटी मध्ये वारंवार शौचास जावे वाटणे,कुणाचे मोठे दुःख बघितल्यावर आतडे पिळवटल्याची भावना अशी विविध भावनांची परिणती बरेचदा पोटातच का हो दिसते?
बटरफ्लाईज इन बॅक किंवा हेड का नाही?भीतीचा गोळा आपल्या पायात का नाही येत?
डिप्रेशन, मानसिक विकारात पेशंट्स एकतर अन्न त्यागतात किंवा अन्न खातच सुटतात, दुखी असताना अजिबात भूक लागत नाही, खाल्लेले पचत नाही, असे का होते ?
पोट/आतडे,आरोग्य आणि मन यांचा संबंध आजच्या ब्लॉग मध्ये बघुयात
आपल्या मेंदूची एक स्वतंत्र कार्यप्रणाली आहे.शरीरात पसरलेल्या असंख्य चेतातंतू आणि स्पायनल कॉर्ड यांच्या द्वारे शरीरातील जवळ जवळ सर्व अवयवांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मेंदू जोडलेला असतो.त्यांवर मेंदूचे नियंत्रण असते ,प्रभाव असतो
ज्याला सेंट्रल ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम म्हणतात.
अगदी असेच १०० लाखांहून अधिक संख्या असलेल्या चेतासंस्थेचे जाळे अन्न नलिकेपासून ते गुद्द्वारापर्यंत असलेल्या पचनसंस्थेच्या नलिकेप्रमाणे असलेल्या भिंतीच्या स्तरांमध्ये पसरलेले असते.चेतातंतूंचे हि संख्या ‘स्पायनल कॉर्ड’ आणि शरीरातील इतर चेतासंस्थेमध्ये असणाऱ्या चेतातंतूपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे हे धक्कादायक वास्तव.
थोडक्यात मेंदू हा पचनसंस्थेत फारसे नाक खुपसत नाही तशी फारशी गरजच मेंदूला पडत नाही. ९ मीटर लांबीचे स्वयंसिद्ध कंट्रोल रूम ते काम लीलया पार पडत असते.
काही दशकांपूर्वी आधुनिक संशोधनात हा शोध हि खळबळजनक प्राप्ती ठरली.मेंदूचे प्रत्यक्ष नियंत्रण नसलेली स्वतःची स्वतंत्र चेतासंस्था असलेल्या पचनसंस्थेला शब्दशः शरीरातील दुसरा मेंदू म्हणणे अजिबात अतिशयोक्ती नव्हे. यालाच आधुनिक शास्त्रात “एंटेरिक नर्वस सिस्टीम” म्हणतात.यात एंटेरा याचा अर्थ आतडे होय.
आयुर्वेदात पचनसंस्थेला महास्रोतस नाव ती संस्था मोठी किंवा लांबच लांब शरीरात पसरते म्हणून निश्चित ठेवले नाही तर या संस्थेच्या कार्यप्रणालीचा प्रभाव बघता महास्रोतस हे नाव योग्य वाटते.

“रुपाली प्लिज ,अगदी मायग्रेन च्या हि पेशंट ला तुम्ही पोट साफ आहे का ,असे कसे विचारता बाबा !” माझी एक मैत्रीण मला कायम चिडवते.किंवा जेंव्हा ऑस्टिओपोरोसिस आणि PCOD चे पेशंट चिकित्सेकरिता येतात ,तेंव्हा बस्ती(पंचकर्मातील एक चिकित्सा ज्यात औषधी एनिमा दिला जातो) द्यावी लागेल असे सांगितल्यावर बरेच पेशंट संभ्रमात पडतात आणि विचारतात अहो ,आम्हाला कॉन्स्टिपेशन चा वैगेरे काही प्रॉब्लेम नाही हो ,आतड्याचा काय संबंध इथे?
त्यांना अशा वेळेस आतडे कसे शरीराची कंट्रोल रूम आहे हे नीट सोप्या भाषेत समजावून सांगावे लागते.

मोठा रहस्यमय आणि गुंतागुंतीचा कारभार या दुसऱ्या मेंदूत म्हणजेच आतड्यात सैदव चाललेला असतो.

फक्त पचनाव्यतिरिक्त फीलिंग ऑफ वेलनेस, फिट,अनफिट किंवा बरे न वाटणे याखेरीज अजून काही मानसिक आरोग्याच्या संवेदना देखील ह्या संस्थेतील चेतासंस्था अनुभवू शकतात असा खरोखर मेंदूला मुंग्या आणणारा सिद्धांत आज संशोधक मांडताय.अशा मनाच्या संवेदना ते मेंदूपर्यंत पोचवतात देखील. मेंदू प्रमाणेच ३० पेक्षा जास्त न्यूरोट्रान्समीटर्स आतड्यातील चेतासंस्था स्रवतात आणि वापरतात.एवढेच काय मानसिक आरोग्य ठरवणाऱ्या काही संप्रेकांमधील सेरोटोनिन हे संप्रेरक पूर्ण शरीराच्या ९५% म्हणजे मेंदूपेक्षाही जास्त इतक्या मोठ्या प्रमाणावर आतड्यात आढळून येते.

पोटापासून मेंदूकडे जाणारी किंबहुना मेंदू आणि पोटाला जोडणारी एकमेव ‘वेगस नर्व्ह’ असते.आश्चर्य वाटेल ती नर्व्ह पोटाकडून विविध संवेदना मेंदूकडे घेऊन जाते मेंदू कडून पोटाला अशी संवेदना मात्र दिली जात नाही . याचा अर्थ गट म्हणजेच आतड्याची स्वनियंत्रित आणि परिपूर्ण स्वतंत्र अशी स्वतःची नर्वस सिस्टीम आहे ,इतर अवयवांप्रमाणे मेंदूकडून संवेदना आणि नियंत्रण जवळ जवळ नगण्य असते.
त्यामुळे गट (आतडे) आणि मनाचे आरोग्य यांचा संबंध हा निश्चित खोलवर होय.वर उल्लेखिलेले सेरोटोनिन योग्य प्रमाणात कमी राखले तर ऑस्टिओपोरोसिस (अस्थिसुषिररता)ह्या व्याधीवर खूप छान नियंत्रण ठेवता येते. किंवा आतड्यातील क्षोभ किंवा इंफेक्शन मूळे ओसेटोपोरोसिस ची शक्यता वाढते हि बाब आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वी अस्थी,कोष्ठ आणि वात या संबंधाने प्रस्थापित केली आहे.
म्हणूच अस्थिसुषिरता व्याधीत सलग काही दिवस नियमित औषधी सिद्ध तेल ,काढा यांचे बस्ती मोठ्या आतड्यात दिले जातात.त्याचे समाधानकारक परिणाम पेशंट्स मध्ये दिसतात.
पचनादरम्यान वापरले जाणारे पित्त दोष, निर्माण होणारा तात्कालिक कफ दोष आणि नंतर पचनाच्या शेवटी तयार होणारा वात दोष देखील एकत्रित रित्या ज्याला आयुर्वेदात त्रिदोष म्हणतात ह्या देखील तर असेच स्वनियंत्रित स्वतंत्र संस्था म्हणूनच कार्य करतात.
‘आम’ ‘आम’ हा आम्हा वैद्यांचा लाडका शब्द बरेच जणांनी वारंवार ऐकलं असेल. पचनाच्या आणि अग्नीच्या विकृतीमुळे तयार झालेले अपाचित किंवा कुपचीत घटक म्हणजे टॉक्सिन किंवा आम आतड्याचे आणि पर्यायाने पुढील इतर अवयवांच्या आरोग्यावर देखील खूप प्रभाव पाडू शकतो.

ID:37091572

म्हणूनच ऱ्हुमॅटॉइड अर्थराइटिस (आमवात),ग्रहणी(कोलायटिस) व इतर अनेक व्याधींचा संबंध सर्वात आधी गट हेल्थ शी येतो.आणि म्हणूनच व्याधी जरी हाडांमध्ये,किंवा शरीरात इतर कुठे व्यक्त होत असला तरी बहुतांश वेळा त्याचे मूळ हे पोटात असते ते असे. पंचकर्म आणि इतर पथ्य अन्न तसेच औषधी हे मुख्यतः पचनसंस्थेतील दोष बाहेर काढून टाकणे आणि त्यांचे शमन करून अग्नी सुधारवणे याकरिता म्हणूनच योजले जातात. बस्ती किंवा इतर पंचकर्मात आतून लिप्त वाढलेल्या किंवा दूषित दोषांमुळे किंवा आमामुळे चेतासंस्थेतील कार्यांचा अडथळा दूर करून तोच कारभार आणि वात पित्त कफाचे पचनाचे कार्य सुरळीत ठेवणे असाच असतो.
अगदी असाच संबंध मानसिक विकार,पोट आणि त्वचाविकारांचा एकमेकांशी असतो.आतड्याचे स्वास्थ्य आणि ऑटिझम व इतर मानसिक आजार , आतड्याचे स्वास्थ्य आणि विविध त्वचाविकार यांचा परस्पर संबंध हा पेशंट मध्ये दिसतोच दिसतो. ऑटिझम मध्ये फाजील वाढलेले सेरोटोनिन हॉर्मोन हा खरा अडथळा असतो आणि सेरोटोनिन व आतडे यांचा संबंध तर आपण पहिलाच. तेंव्हा आतड्याचे स्वास्थ्य त्यातील हॉर्मोन्स आणि चेतासंस्था स्वस्थ असतील तर अर्थातच ऑटिझम काही प्रमाणात आटोक्यात राहतो किंवा त्याउलट ऑटिझम मधील वर्तनविकार आतड्यातील कारभार बिघडल्यास वाढतात यावर अनेक संशोधन झालेय. स्ट्रेस वाढला,पोट बिघडले कि सोरायसिस चे चट्टे वाढतात खाज वाढते हे तर अगदी खात्रीशीर पणे पेशंट देखील सांगतात. इतकी हि सगळी गुंतागुंत ह्या दुसऱ्या मेंदूत सुरु असते.

पोटाच्या पोटात खूप काही दडलंय हे नक्की म्हणून विशेष काळजी घ्या. म्हणजे तुमचे ‘गट फिलिंग’ नेहमी तुमची साथ देईल. मध्ये एक वाचलेले वाक्य किती चपखल आहे बघा, “इट टेक्स गटस टू बी द गट्स “!

Share this :

2 thoughts on “Gut: The second brain in body!”

  1. Dwitiya Sapkal

    Loved this blog! After reading her book, I contacted her! She is not just a good blogger, but an experienced Ayurveda doctor and a nutritionist!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart