skip to content

Idali controversy!

! ! खूप विविध मत मतांतरे असलेला विषय ! !

इडली खावी कि नाही ? पदार्थ आंबवणे ह्या प्रकाराबद्दल आपले काय मत आहे ?
उत्तर: सर्वात जास्त विचारला जाणारा आणि खरोरच विचारलाच पाहिजे असा प्रश्न. ह्याचे सविस्तर पैलू बघू. उकडे तांदूळ,उडदाची डाळ भिजवून बारीक वाटून मग ती नैसर्गिक आंबवले कि इडलीचे पीठ तयार होते.ह्या आंबवलेल्या पिठात सच्छिद्रता असते बारीक बुडबुडे असतात कारण आंबवण्याच्या प्रक्रियेत त्या पिठात वायू तयार होतो. प्रोबियॉटिक म्हणून ओळखले जाणारे हे पीठ पचनाची एक अवस्था पार केलेले असते.त्यामुळे ते तुलनेने हलके असते. ह्या प्रक्रियेत त्या पिठातील आम्ल गुण म्हणजे आंबटपणा गुण वाढलेला असतो. आंबटपणा हा शरीरात विदाह किंवा जळजळ निर्माण करू शकतो.
ह्या पिठाच्या इडल्या वाफेवर उकडवल्या जातात.तसेच ह्याच पिठाचे डोसेही लावले जातात.
इडली मध्ये पाण्याचे प्रमाण राखले जाते आणि शिजवणे वाफेवर होते तर डोस्या मध्ये तव्यावरील उष्णतेने त्यातील पाणी उडून जाते. वाफेवर शिजलेले पदार्थ तुलनेनें अग्निसंस्कार झालेल्या पदार्थांपेक्षा पचायला जड असतात.
इडली डोसा खाल्यावर काही काळाने लगेच भूक लागते असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे कारण ते पीठ लघु गुणाचे असते म्हणजे पचायला अवधी कमी लागणारे असते.कदाचित याच मूळे ते जास्त प्रमाणात खाल्लेही जाते.
त्यामुळे एकंदरीत आम्ल गुण पोटात वाढतो जो पित्ताच्या समान गुणांचं असल्याने पित्त वाढवू शकतो.
मग इडली डोसा कसा खावा जेणे करून त्याचा त्रास टळेल आणि गुणांचा फायदा होईल.
लोणी किंवा तुपावर परतलेली इडली अथवा डोसा कमी विदाह निर्माण करतो. अवंतिका नावाचे एक पारम्पारीक पुराण काळातील वर्णित व्यंजन आहे .त्यात इडली सदृश तांदूळ आणि गहू वापरून केलेला पदार्थ हा तुपावर परतून खावा  म्हणजे विदाह कमी होतो असा एक उल्लेख होय.
त्यामुळे डोसा त्यातही लोणी डोसा हा त्यामाने पचायला अजून हलका आणि त्यातल्या त्यात कमी विदाह निर्माण करणारा असे आपण म्हणू शकतो.
तसेच इडली हि खूप फसफसवलेल्या पिठाची असेल तर खाणे अजिबातच नको. जे बरेचदा विकतच्या पिठात दिसते.
तांदूळ उडीद डाळीचे पीठ भिजवून केलेला इडली डोसा हा अक्खे तांदूळ डाळ भिजवून वाटून केलेल्या इडली डोस्यापेक्षा नक्कीच पचायला जड असतो. त्यामुळे कोरडे रेडी टू ईट पीठ तयार मिळते ते वापरणे टाळावे.
इडलीचे पीठ फ्रिज मध्ये ठेवून मग परत परत ३-३दिवस वापरणारे बरेच जण नक्कीच पित्ताच्या विकारांना आमंत्रणच देतात.
इडली डोसा जेवताना नकोच तो सकाळी नाश्ता म्हणून आणि खूप पोटभर न खाता मोजकाच खावा.महाराष्ट्रातील कोरडया आणि उष्ण हवामानात हे पाळले जाणे आवश्यक होय. त्यामुळे ते रोज रोज खाणे अवश्य टाळावे. अर्थातच आपण खाद्यसंस्कृती ,प्रादेशिक संस्कृतीत पहिले कि इडली मुख्यतः दक्षिणेकडील राज्यांचा पारंपरिक पदार्थ होय. तिथल्या खाद्यसंस्कृतीला तो अधिक सात्म्य.

किती,केंव्हा, कुणी आणि किती वेळा या ‘ क’  चे योग्य पालन हे महत्वाचे होय !

Share this :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart