skip to content

” उत्क्रांती , आयुर्वेद , संस्कृती आणि आरोग्य “

Hashtag , Keywords 🙂 🙂 : “उत्क्रांती , आयुर्वेद , संस्कृती आणि आरोग्य ” !!!!!!!!!!!

आपण जागरूक आहोत आहाराबद्दल , आरोग्याबद्दल . मिळेल त्या माध्यमातून भाषेतून आपण आरोग्य विषयी जाणून घेत आहोत . त्यात हि आज आयुर्वेद शास्त्राबद्दल जनजागृती आणि आयुर्वेदातील मूल्यवान आहार आणि औषधी विषयी खूप छान माहिती रोज whats app , Facebook आणि इतर माध्यमातून उत्तम प्रकारे प्रसारित होत आहे . आरोग्याविषयीचे हे अभियान म्हणजे एक क्रांतीच म्हणावी लागेल . याचे दूरगामी फायदे पिढ्यान पिढ्या दिसतील .

आरोग्य ह्या संकल्पनेकडे बघण्याची वेगळी दृष्टी आज आयुर्वेदातील संकल्पना समजून घेताना आपल्याला गवसत असणार. आम्ही आयुर्वेदा चे शिष्य हि अनुभूती घेत च समृध्द होत आलोय .मनुष्य प्राण्याचे जीवन हे शरीर धारणास्तव केलेले अन्न भक्षण , मलमूत्र विसर्जन ,संभोग आणि कालयोगाने मृत्यू इतके अप्रगल्भ निश्चित नाही.तसेच आरोग्य ह्या शब्दाची व्याप्ती, शरीरातील काही अवयव त्यांचे बिघाड आणि त्यावरील उपाय एवढी संकुचित किंवा mechanical नाही (सुदैवाने ). कारण अजूनतरी आपण गाडी servicing ला टाकतो त्याप्रमाणे आपल्या प्रिय व्यक्तीला डॉक्टरकडे सोडून ,” ए बघ रे जरा काय part बिघडलाय , कुरकुर चाललीये दोन दिवस झाले . उद्या ऑफिसात जाताना घेऊन जातो , तोवर करून ठेव नीट” असे म्हणत नाही .

पृथ्वीच्या निर्मितीपासून निर्माण झालेल्या अमिबीय जीवापासून मनुष्य अशी अचाट , अकल्पित उत्क्रांती , प्रगती किंवा अजून काही योग्य शब्द असेल तर तोः घ्या . तर हे सगळे निसर्गातील दृश्य , अदृश्य , सिध्द , प्रत्यक्ष प्रमाण असलेले, अनुमान प्रमाण सचोटीवर उतरणारे , कलनीय अनाकलनीय बाजू असणारे हजारो प्रमेय च आहेत कि .

माणूस हा  “प्राणी टप्प्यावर” च असताना केवळ प्राणीसुलभ शारीरिक विकासाचा एक limited era ओलांडून त्याही पलीकडे जाऊन माणूस नावाच्या प्राण्याचा विकास झाला . ह्या प्राण्याच्या उत्क्रांतीचे महत्वाचे टप्पे हे मानसिक विकासावर आधारलेले होते.

निसर्गाच्या सानिध्यात राहुन निसर्गाचे , ऋतूंचे , निसर्गातील घडामोडींचे , आपत्तींचे ,उपलब्धींचे, सौंदर्याचे , सुहृदाचे, सृजनाचे, प्रसंगी क्रौर्याचे , विनाशाचे , संहाराचे धडे हा भविष्यकाळातील महाशक्ती असणारा परंतु त्याकाळी प्राणी ह्या परिभाषेची कात टाकायला निघालेला मनुष्य प्राणी गिरवत होता . हे धडे तोः असे गिरवत होता कि त्याची ABCD येणाऱ्या हजारो लाखो पिढ्या तो वारसा पुढे नेणार होत्या. प्रत्येक वेळी पुढे नेताना त्या तोः वारसा प्रगत, सोप्या भाषेत सांगायचे तर update करत जाणार होत्या . genetic mutation हो वेगळे काही नाही . हा आता कळले बुवा , इतका वेळ काय बोलताय कळत नव्हते न , असो .

तर एका विशिष्ट काळानंतर निसर्गाने जन्माला घातलेले हे मनुष्य बाल निसर्गावर राज्य करू लागले . स्वताचा अभ्यास करू लागले .

गरज , भूक इतपत झेप न राहता निर्मिती हि सगळ्यात महत्वाची झेप माणूस घेत होता.

या मानसिक विकासाचा मनुष्याच्या शारीरिक अवयवान इतकाच विकास आणि बदल होत होता . निसर्गाचे शरीरावर होणारे परिणाम माणूस जसा जसा जाणून घेऊ लागला तसतसा त्याच्या जीवनशैलीत बदल झाला . हे प्राथमिक सत्य आपण सगळे जाणतोच . परंतु यातून जी एक मोठी गोष्ट घडली , ती म्हणजे संस्कृती निर्माण झाली. जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या जागी राहणाऱ्या , वेगवेगळी भौगोलिक परिस्थती , वेगवेगळे उपलब्धी असणाऱ्या मनुष्य गटांचे राहणे ,खाणे आणि एकंदरीत च एक जीवनशैलीचा उदय झाला .

जीवन शैलीचा असा उदय होणे हि आरोग्य या संकल्पनेची नांदी होती . कृपया मागील वाक्य नीट परत परत वाचा . सजीव सुलभ स्वतःचे शरीर धारण करणे , स्वतःचा बचाव करणे आणि स्वतःची जात ( मनुष्य जात , कृपया जात शब्द tolerantly घ्यावा ) प्रजनन करून वाढवणे ह्या मूळ हेतुंमध्ये उत्तमोत्तम बदल या जीवन शैली मुले घडून आले .

म्हणून जीवन शैली आणि संस्कृती हे दोन खूप महत्वाचे मुद्दे या लेखात अधोरेखित करावेसे वाटतात .

कारण हि जीवन शैली आणि संस्कृती त्या ठिकाण आणि काळ ह्या कसोटीवर उतरत असते . तसेच पिढ्यान पिढ्या आहार , विहार आणि जगण्याची एक विशिष्ट पद्धत ज्याला आपण आचार म्हणतो हि संस्कृती जपत असते .

तर मुद्दा असा आहे आरोग्य हि संकल्पना हे संस्कृतीच्या उगमापासून असावी . अश्या वेगवेगळ्या संस्कृती पृथ्वीतलावर वेगवेगळे अलिखित, अफाट literature निर्माण करत होत्या .

कुठे न कुठे ह्या सगळ्यांचा संबंध मनुष्या प्राण्याच्या टिकणे , जगणे आणि निरोगी राहणे इथे येउन च संपत . शरीरा बरोबरच मनाचा पसारा आणि महत्व हळू हळू उलगडत होते . माणसाच्या अन्न , वस्त्र आणि निवारा या तीन गरंजा चा वेगवेगळ्या शाखां मध्ये विस्तार झाला .

असा विस्तार होत असताना मूळ उद्देश मात्र अबाधित होता . माणूस त्याचे जगणे , टिकणे आणि प्रजनन . या गरजांच्या आजू बाजू च वेग्व्गेल्या शाखा विस्तारित होत होत्या अभ्यासल्या जात होत्या.

थोडक्यात या विस्ताराला जीवन शैलीला , ज्या काळात विज्ञान , शास्त्र , सिद्ध असे शब्द अस्तित्वात पण नव्हते , त्या काळात स्व प्रामाण्याचा अनुभव होता .

आणि म्हणूनच ह्या विशिष्ट काळानंतर मनुष्य प्राण्याची सर्व शास्त्रातली प्रगती आणि तरीही मूळ हेतू अबाधित होता आणि आहे .

आज golbalisation च्या युगात संस्कृती ह्या concept चे सगळे खांब च गळून पडतात . जगाच्या पाठीवर वेग्व्गेल्या भौगोलिक वातावरणात राहणारे आपण पामर जीव कुठल्याही संस्कृतींची जीवन शैली आपल्या हवी तशी हव्या त्या पद्धतीने अमलात आणतोय . आपण जास्त काळ राहतोय त्या आजूबाजूचे निसर्गाचे आणि आपल्या शरीरातले अणू रेणूंचे करार आपल्याला माहित नसतात पण असतात हे १००% सत्य .करार मोडला कि दंड भरावा लागणारच . करार मोडण्याचे मध्यम काय तर , मी काय खातो , मी कसा राहतो (जीवनशैली) आणि मी कसा वागतो ( मानसिक आणि शारीरिक नियम ). म्हणजे च संस्कृती .

संस्कृती हि कुठल्याही जाती अथवा धर्माची नसते . संस्कृती आणि धर्म या खूप वेगळ्या गोष्टी आहेत असे सुजाण वाचक जाणतातच.

जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी शरीर आणि शरीर भाव सारखेच राहणार हो , परंतु त्या भौगोलिक वातावरचा , तापमान , उपलब्ध अन्न , ऋतू प्रकार , समुद्र सपाटी पासूनची उंची , यानुसार शरीराचा आणि निसर्गाचा करार झालेला असतो . त्यानुसार बदल होतात शरीर भावात निसर्गाला अनुसरून .

त्यानुसार खाण्या पिण्याचे आणि इतर जीवन शैलीचे नियम आपोआप च आत्मसात होतात .

अरे हो हेय सगळे लिहण्याचा प्रपंच का तर माझ्या एका patient ने मला विचारलेला निरागस प्रश्न . patient भारतीय नाही, email मधली प्रांजळ शंका , ” I wonder whether , we Europeans too have vaata pitaa and kafa dosha like you Indians as said in Ayurveda ? ”

त्याच्या शंकेचे योग्य उत्तर पोचवले अन लगेच लिहायला घेतले .

संस्कृती global असेल किंवा नसेल , परतू आयुर्वेद ग्लोबल आहे निश्चित . कारण आयुर्वेदात वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांनुसार मनुष्य शरीतातील प्रकृती , दोष , धातू , आहार , विहार , आचार , व्द्याधी त्यावरील उपाय आणि व्याधी च होऊ नयेत म्हणून follow करायची संस्कृती ह्याचे विवेचन आहे .

अहो कुठल्या medicine science मध्ये उलेख्ह असेल का, कि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आरोग्याशी निगडीत रोज संबंध येणाऱ्या गोष्टी यथोचित कशा कराव्यात .बाराखडी च कच्ची असेल तर ग्रंथ काय लिहणार . असे महत्व दिनचर्ये चे आहे म्हणून प्रत्येक ग्रंथात सुरुवात दिनचार्येपासून च आहे .ऋतूनुसार आपला आहार , आचरण आणि preventive measures कसे असावे हे आयुर्वेद च सांगणार कारण …कारण संस्कृती हो बाकी काही नाही .

रोज खाण्यात असणार्या भाज्या , फळ , इतर व्यंजने यांचे गुणधर्म आणि व्याधीवर त्यांची उपयुक्तता याचे सविस्तर वर्णन इतर कुठल्या pathy मध्ये सापडेल का …आयुर्वेदातातच का ..कारण संस्कृती हो .

syllabus उघडला कि रोग आणि औषधे असे शास्त्रच नाही मुळी.

मला तर आयुर्वेद हा सर्वांग सुंदर अत्त्युत्तम कलेचा नमुना वाटतो कायम . असो विषय लांबतोय …उपलब्ध माहितीचा फायदा घ्या , अर्धी हळद पिउन गोरे व्यायचा प्रयत्न करण्या अगोदर योग्य वैद्या चा सल्ला घ्या . टिप्स च्या आहारी किती जायचे याचे सुज्ञ भान ठेवा . आयुर्वेदा बद्दल उत्तम माहिती पोचवण्याचे काम अखंड सुरु राहो .

वैद्या. रुपाली जोशी पानसे

आद्यं आयुर्वेद , पुणे

aadyam .ayurved@gmail .com

९६२३४४८७९८

(लेख आणि लेखातील माहिती आवडली आणि आपल्या सुहृदापर्यंत पोचवावी वाटल्यास कृपया लेखिकेच्या नावासकट share करावे . लेखावरील प्रतिक्रिया शंका आणि अनुभव यांचे स्वागत आहे कारण त्यामुळे लेखाचा उद्देश अजून सफल होतो )

Share this :

1 thought on “” उत्क्रांती , आयुर्वेद , संस्कृती आणि आरोग्य “”

  1. Nice info !
    Even I have Blog site “sellonlinewithus.com” where you can write your any business related blogs.
    Benefit of writing: Daily 5000 customers or people visit my blog site and they also happened to read your article, such a good reach I have, I do lot of advance digital marketing daily to increase people’s visits.
    So if you have any kind of business and want an instant reach then this can be the solution

    Thanks,
    Jitendra Deshpande, Pune
    Owner: sellonlinewithus.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart