“अर्रे ए मादर***….चाल कि पेप्सी खाऊ कि …… अगदी दवाखान्यालगत असलेल्या शाळेच्या ग्राउंड वरून जोरात कोणीतरी निरागस विद्यार्थी आपल्या परममित्राला संबोधून बोलत होता . समोरच्या पेशंट आजीनी चमकून खरे तर दचकून माझ्याकडे पहिले आणि कसेबसे हसत बोलल्या , “आज कालची मुले ना …” मी फक्त हम्म म्हंटले . हाच प्रसंग आणि कारण आजचा हा ब्लॉग लिहायचे .
, #gender #parenting #schooling #porn #addiction #teenageconfusion
संवाद वय वर्षे 2 ते 10 : बेटा चुळ नीट भर , बाळा अभ्यास कर बरं का , अगं धावू नकोस , अर्रे किती मळवले ते कपडे बदल जा , मारामारी नको करू रे , अगं कित्ती गोड़ दिसतोय ग फ्रॉक , पिल्लू तो डान्स करून दाखव ना काका काकूंना.
संवाद वय वर्षे 10 ते 14 : अगं केस बांध आधी , का उडया मारतेय , तो स्कर्ट बदल आणि नीट काहीतरी घाल अंगभर, तू गेलीसच का त्या मुलाशी बोलायला दुर्लक्ष कर , आता जरा नीट राहत जा ग , मान खाली घालून चालायला काय झाले तुला ,अरे ग्राउंड वर जात जा , घाबरलीस का ठेवून द्यायची एक हिम्मत कशी झाली त्याची , तुझी चूक नाही तू का रडतेस , मुलांनी मारामारी केलीच पाहिजे शाब्बास रे माझ्या शेरा ,तुला का लाज वाटतेय , आणि असे असंख्य वाक्ये .
काय फरक आहे दोन ग्रुप मध्ये . आधीच्या ग्रुप मध्ये सूचना या मुलगा आणि मुलगी दोघांनाही आहेत . जसजसे वय वाढते तसे तसे मुलाला देण्याच्या सूचना आणि मुलीला देण्याच्या सूचना बदलत जातात . काय चांगले काय वाईट असे काहीही ठरवायचे नाहीए किंवा मी पालकत्व या विषयातील तज्ञ् हि नाही . पालक या भूमिकेत बरेच वेळा मी पण भरडली जातेय आणि तेवढेच आई असण्याचे सुख हि भरभरून मिळतेय .
कुतूहल पोटी काही प्रश्न पडले मला .
मुलगी जशी जशी मोठी होते तेंव्हा खूप सहजपणे स्वाभाविकपणे तिची आई हळू हळू तिच्या वागण्या बोलण्याविषयी तिला सांगते आवश्यक ते बदल घडवून आणते . खूप जास्त नैसर्गिक असते ते आपण काहीतरी खूप भारी करतोय याची जराशी सुद्धा कल्पना नसते त्यांना .बस पिढ्यान पिढ्या होतेय ते . कसे कपडे घालावे , कसे बोलावे ,पुरुषांशी कसे वागावे बोलावे याच्या वेगळ्या सूचना ,वयात येताना , आल्यावरच्या वेगळ्या सूचना , आधार , माया प्रेम असे स्वाभाविक पणे होते . मुलींवर घातली जाणारी बंधने वैगेरे वैगेरे यावर मला अजिबात वाच्य नाही करायचे. माझा concern एक्साक्टली त्याच वयातील मुलांबद्दल आहे.
sexuality किंवा sex education हाही मुद्दा नाही सांगायचं मला . हि तर पुढची गोष्ट आहे.
मला प्रश्न पडतो कि खालील साध्या गोष्टी पालक आपल्या मुलाला सांगत असतील का , सांगायला हव्या का , गरज आहे का ( माझे मत तर हो अतिशय गरज आहे असेच आहे . )
मुलीच्या शरीरातील बदलाची जशी आई तिला कल्पना देते तशी मुलाच्या शरीरातील बदलाची कल्पना वडिलांनी आणि काही अंशी साध्या भाषेत आई ने हि दिली तर केवढा भावनिक आधार मिळेल मुलाला. शरीरसंबंध ,पॉर्न हे विषय अनपेक्षित रित्या धाडकन , काहीही कल्पना नसताना अगदी लहान वयात समोर आले तर काही मुलांवर त्याचा मानसिक आघात झालेल्या काही केसेस मी पहिल्या आहेत. एक आई म्हणून , एक पालक म्हणून नक्कीच खूप प्रश्न पडतात कसे सांगावे , काय सांगावे सांगू कि नाही केंव्हा सांगू . मुले हिंट देत असतात कदाचित आपण ते समजायला कमी पडत असू . विचारलेल्या प्रश्नांची काहीतरी fantacy सारखी उत्तरे न देता त्यांच्या वयाला जेवढे आवश्यक तेवढे ज्ञान दिले तरी खूप होत असावे .
1. मुलीला आपण खूप सहज सांगतो कि मुलांकडे बघू नकोस खाली मान घालून चाल , उगाच हसू नकोस असे खूप काही …..तसे आपण मुलाला सांगू शकतो का कि बेटा , मुलींशी असे नको वागूस , असे नको बघूस , असे काही नको करुस कि त्यांना लाज वाटेल किंवा त्या घाबरतील . ज्या गोष्टींमध्ये तुला मजा येतेय किंवा तुला त्या निरुपद्रवी वाटत असतील परंतु कदाचित त्या गोष्टी तुझ्या आजूबाजूच्या मुलींकरिता त्रासदायक , अपमानकारक आणि भीतीदायक असू शकतात . तुला आवडणाऱ्या मुलीचा तू केलेला पाठलाग तुझ्यासाठी जरी फार काही मोठी गोष्ट नसली तरी त्या मुलीला ह्या गोष्टीचा भयंकर मानसिक त्रास होऊ शकतो . ह्या घटनेचे पडसाद भविष्यकाळात अजून उग्र स्वरूप धारण करू शकतात. यासारख्या गोष्टी मुलांबरोबर बोलायला हव्या ना ? TV सिनेमांमध्ये दाखवले जाणारे स्त्री चे चित्रण हे वास्तवात तसे नसते हेय किती पालक आपल्या मुलाला सांगत असतील . कापड लत्ता, वेगेवेगळ्या फी , classes लावले, अभ्यासाला बळजबरी बसवले कि पालक ह्या नात्याची जबाबदारी संपते का?
2. आज खूप लवकर मुले शिवी या प्रकाराला introduce होत आहेत . खूप कमी वयात एक वाक्यात 2 2 अर्वाच्य शिव्या हि काही चांगल्या घरातील वाटणाऱ्या मुलांकडून पब्लिक place मध्ये मी ऐकल्या आहेत . दुर्दैवाने कि सुदैवाने माहित नाही पण कमी संख्येत तरीही मुली पण यात सहभागी आहेत.
पूर्वी सिनेमा मध्ये Bastard आणि Rascal हि शिवी खूप स्टाईल मध्ये हिरो आणि विशेष करून हिरोईन च्या तोंडी दाखवली जायची.
मला आठवते 11 एक वर्षाची असेन , खेळता खेळता दादा बरोबर भांडण सुरु झाले आणि अगदी नुकत्याच पाहिलेल्या कुठल्यातरी सिनेमातील हिरोईनची पुरेपूर कॉपी करत मी एकदम स्टाईल मध्ये बोलले , “YOUUUU Bas ***** ” एक सेकंदाच्या आत कानामागे खणणणण आवाज आणि मुंग्या आल्या . मला कळलेच नाही याला काय झाले एकदम . दुसऱ्या मिनिटाला समोर दाणकन dictionary आपटली माझ्यासमोर बसला तोच शब्द शोधून त्याचा अर्थ जोरात वाचायला लावला.(तू ब्लॉग वाचतोय ना दादा , आठवले ?)
मुलगा किंवा मुलगी जेंव्हा कुणाचे ऐकून बघून वाचून शिवी देतात तेंव्हा आपली जबाबदारी असते ना आधी त्याचा अर्थ सांगावा ..नुसते रागावून काय साध्य होणार . अर्थ कळाला तोही आई किंवा बाबां कडून , तर पुढे शिवी दिलीच जाणार नाही किंवा देताना किमान लाज तरी वाटली पाहिजे स्वतःची. शिवी देणे हि style वाटते हा एक अजून मुद्दा आहेच म्हणा . पर्सनल चॉईस शेवटी परंतु कोवळ्या वयात हि जाण दिली तर प्रमाण नक्कीच कमी होईल .
जेंव्हा मुलगा किंवा मुलगी पहिल्यांदा दारू हा शब्द उच्चारतो तेंव्हा आपली पहिली reaction गप रे गप ग, परत बोलू नकोस असे हं, अशी येणे स्वाभाविक असले, तरी ती तशी येणे बरोबर आहे का ? त्यांनी विचारलेला प्रश्न कदाचित आपल्याला संधी असते त्या गोष्टींबद्दल योग्य ते त्यांच्या पर्यंत पोचवायची . शेवटी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत च आपण मुलांवर बंधन ठेवू शकतो. परंतु योग्य वयात योग्य ती माहिती दिली तर योग्य तोच निर्णय किंवा त्यांनी घेतलेला निर्णय हा विचार करून घेतलेला असेल. मित्र करतात, स्टाईल वाटते, हिरो करतो , सगळेच करतात अशी परिस्थिती प्रेरित तरी नसेल.
लिहावे तेवढे वाढेल ह्या ब्लॉग पुरता एवढेच .मुख्य म्हणजे पालक म्हणून स्वतःला आधी समजून घेणे जास्त आवश्यक आहे . आपल्याला काय अनुभव तसेच प्रतिक्रिया नक्की कळ्वा.
बहुत अच्छा लेख इसके लिए धन्यवाद डाॅ रुपाली