‘आध्यात्मिक स्वास्थ्य’ ???? हे काय असते?
एक आयुर्वेदिक डॉक्टर आज अध्यात्मविषयी का लिहितेय असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. मुळात आयुर्वेदाची संपूर्ण जडणघडण च मन शरीर आणि त्यांचे स्वास्थ्य यावर आहे. मानसिक /अध्यात्मिक स्वास्थ्याचा एकंदरीत शारीरिक स्वास्थ्यावर खूप मोठा प्रभाव असतो. आम्ही डॉक्टर नाना तर्हेचे रुग्ण बघत असतो. अगदी शुल्लक आजारामुळे काही रुग्ण खचून जातात निराश होतात कोलमडून पडतात तर कधी कधी अतिशय गंभीर आजारालाही काही रुग्ण हसतमुखाने आणि साहसाने सामोरे जातात. अशावेळी मनाचे स्वास्थ्य अध्यात्मिक पाया नजरेतून सुटत नाही . अगदी असेच एकाच व्याधीवर एकच औषध काही रुग्णांमध्ये उत्तम काम करते तर काही रुग्णांमध्ये करत नाही . याचेही कारण बरेचदा अध्यात्मिक स्वास्थ्यात सापडते.त्यामुळे अध्यात्मिक स्वास्थ्य जर जपले आणि जोपासले गेले तर त्याचा सकारात्मक प्रभाव शारीरिक स्वास्थ्यात निश्चितपणे दिसू शकतो.
तसेच अध्यात्मिक स्वास्थ्याचा परिणाम व्यक्तीची जडणघडण, करिअर, खाजगी नातेसंबंध, नातीगोती, उतरचढावाला सामोरे जाणे ,अर्थार्जन आणि याखेरीज आयुष्यातील महत्वाच्या बाबींवर होत असतो.
त्यामुळे मानसिक स्वास्थ्य /अध्यात्मिक स्वास्थ्य म्हणजे उतारवयातील काहीतरी करायची गोष्ट असे न पाहता अगदी लहानपणापासून रुजवावी अशी बाब होय.आज ज्या स्पर्धात्मक आणि ताणतणावाच्या युगात आपण राहतोय ते बघता तर स्किल म्हणून शाळा कॉलेजांमध्ये खास शिकवल्या जावे इतकी महत्वाची होय.
आज संपूर्ण वैद्यकीय जगाला पूर्णपणे पटलय कि स्वास्थ्य म्हणजे रोग नसणे , इतकी त्रोटक व्याप्ती स्वास्थ्याची नाही. सुदृढ शरीराबरोबरच सुदृढ मन देखील त्या व्यक्तीला स्वस्थ ठेवण्यासाठी तेवढेच आवश्यक होय. त्यामुळेच मनाच्या स्वास्थ्याशी निगडित विविध उपचार पद्धती आज उदयास येताय. त्यातच स्पिरिच्युऍलिटी हा शब्द वारंवार कानावर पडतोय.आपआपल्या परीने प्रत्येक जण हा शद्बाचा अर्थ हि लावतोय. पण खरेच आपल्याला कळले का स्पिरिच्युऍलिटी म्हणजे काय ते ? स्पिरिच्युअल हेल्थ म्हणजे काय ?
- मंदिर,चर्च,मशिदीत जाणे म्हणजे स्पिरिच्युअल का?
विशिष्ट कपडे म्हणजे पांढरे, भगवे,हिरवे घालून जमावाचे उदबोधन करणे म्हणजे स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक असणे होय का?
पूजा अर्चा उपास रोजे फास्ट करणे म्हणजे अध्यात्मिक असणे किंवा स्पिरिच्युअल का?
नास्तिक लोक स्पिरिच्युअल असतात का किंवा असू शकता का ?
एखादी व्यक्ती अतिशय आधुनिक विचारांची देव न मानणारी,रीती रिवाज न पाळणारी ,पब क्लब मध्ये जाणारी परंतु अतिशय सकारात्मक विचारांची असून समाजात प्रत्येकाची मदत करते ,स्वतःची आंतरिक प्रगती आणि मानवता असे संस्कार आचरणात आणते. तर ती व्यक्ती आध्यात्मिक आहे कि नाही?
जर एखादी व्यक्ती नियमित उपास तापास करते देवस्थळी(मंदिर मशीद चर्च इत्यादी) जाते परंतु प्रत्यक्ष जीवनात ती इतरांचा दुस्वास करणे, मनशांती नसणे, फसवणूक करणे असे वर्तन असेल तर ती व्यक्ती अध्यात्मिक आहे असे म्हणू शकतो का?
अध्यात्माची सांगड आपण धर्माशी देवाशी लावतो इथेच आपण चुकतो. स्पिरिच्युअलीटी,आध्यात्म हे इतके संकुचित नाही.दर वेळेस धार्मिक असणे म्हणजे स्पिरिच्युअल असणे नव्हेच. धर्म आणि अध्यात्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी होत.
तो बघ तो चंद्र असे एखादा व्यक्ती बोटाने चंद्र दाखवतो तेंव्हा चंद्र आणि बोट हे वेगवगेळे असतात. चंद्र हे अध्यात्म तर बोट हे धर्म असे आपण म्हणू शकतो. अध्यात्माकडे मनुष्यास दिशा देणे हे काम धर्म करू शकतो परंतु धार्मिक असणे म्हणजेच आध्यत्मिक असे नव्हे. दोन्ही गोष्टी वेगवगेळ्या आणि जर परस्पर पूरक ठरल्या तर फारच उत्तम.
- मग अध्यात्म म्हणजे काय ?
माझे या मनुष्य जन्मातील ध्येय काय ?
यश आणि पैसे यामागे प्रत्येक जण धावतोय म्हणून मीही धावावे कि माझ्या निश्चित सीमा मीच ठरवावा?
मला माझ्यात आंतरिक सकारात्मक बदल करावयाचे ,मी काय केले कसे वागले म्हणजे ते होतील?
सर्व गोष्टी क्लिक सरशी मिळणाऱ्या जगात मी समाधानी का नाही?
संवादाचे कित्येक आधुनिक साधने उपलब्ध असताना मी एकाकी का ?
मनुष्य म्हणून माझ्या आयुष्यात माझी काय भूमिका ?
या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आणि सापडलेली उत्तरे म्हणजे अध्यात्माकडे प्रवास होय.
अध्यात्म हि दाखविण्याजोगी भौतिक गोष्ट नव्हे ती अनुभूती असते.
वरील सर्व प्रश्नांची उत्तरे काही शब्दांमध्ये अचूक सापडतात ते शब्द म्हणजे. श्रद्धा(Hope),प्रसन्नता(joy),प्रेम(Love),क्षमाशीलता(Forgiveness ),शांती(Peace),empathy(सहानुभूती) empathy(कृतज्ञता) जिव्हाळा,kindness(दयाळूपणा), sensitivity(संवेदशीलता) हे आणि असे इतर भाव म्हणजे अध्यात्माच्या विविध पायऱ्याच होत.
मनुष्य पेरणी अजब रसायन होय.वागण्याबोलण्यावरून मनाचा थांग लागत नाही असे आपण बरेच म्हणतो. त्याचे काय कारण असावे?
मानवी मन म्हणजे हिमनग च!
हिमनग म्हणजे iceberg याचे एक वैशिष्ट्य आपण सर्वाना माहित आहे हि हिमनगाचे छोटे टोक म्हणजे हिमनग नसतो पाण्याखाली कित्येक मैल त्याची खोली आणि विस्तार असतो.अगदी असेच आपले बोलणे आणि वर्तन म्हणजे हिमनगाचे टोक होय परंतु ज्या beliefs (श्रद्धा),विचारसरणी (thought प्रोसेस),संस्कार(Values ) आणि मानसिकता यांच्यामुळे आपले व्यक्त वर्तन ठरते. परंतु खोल आत न दिसणारे परंतु अस्तिवात असणाऱ्या गोष्टी मनात असतात.
physical expressions ला mental foundation कारणीभूत असते.
अध्यात्मिक स्वास्थ्याची थोडक्यात व्याख्या करायची झाल्यास , अध्यात्मिक स्वास्थ्य म्हणजे मनाची अशी सजग आणि संतुलित अवस्था जी मनुष्याच्या वागण्या बोलण्यातून त्याचा आंतरिक सद्हेतू आणि सकारात्मकता दाखवते.
शरीर स्वस्थ असे आपण केंव्हा म्हणतो जेंव्हा शरीर व्याधी विरहित असेल तेंव्हा. अगदी तसेच मन व्याधी विरहित असेल तेंव्हा मन स्वस्थ! आणि याही पलीकडे जाऊन असे स्वस्थ मन वर उल्लेख केलेल्या सद्गुणांची जेंव्हा वर्तनातून अविरत पखरण करते तेंव्हा ते त्या व्यक्ती चे अध्यामिक स्वास्थ्य असते.
अध्यात्मिक स्वास्थ्य कसे ठरते?
जसे प्रत्येक माणसाला स्वतःची शारीरिक जडण घडण असते तसेच जन्मतःच तो मनाची जडण घडण घेऊन आलेला असतो. सत्व रज आणि तम् गुणांनी त्याचे मानसिक स्वास्थ्य ठरते. जे पूर्णतः बदलणे शक्य नसते.
परंतु कुटुंब, समाज आणि ज्यांच्या सहवासात ते मूल वाढते त्या सर्व बाबींचा खूप मोठा प्रभाव त्या मुलाच्या मानसिक आणि पर्यायाने अध्यात्मिक स्वास्थ्यावर पडतो.
द्वेष ईर्षा, मत्सर,कलह,तंटा फसवणूक असे संस्कार मिळालेल्या समाजातील अथवा घरातील मूल प्रेम दया सहानुभीती जिव्हाळा यासारखे भाव परत वागण्यातून समाजाला देणे निव्वळ अशक्य.
जसे अस्वच्छता, निकस अन्न,व्यसन, infections, शरीरात विविध रोग निर्माण करतात अगदी तसेच ह्या गोष्टी मनाच्या स्वास्थ्यला घातक! कसे ?
****मनाची अस्वच्छता: मनात विविध भाव जसे अपमान, किळस, भीती ,अवहेलना, अपयश,दुस्वास, यासारख्या भावना तशाच साचुन राहणे. या घातक भाव भावनांचा निचरा झाला नाही तर ती मनाची अस्वच्छता च होय .
****निकस अन्न : मनासाठी अन्न काय तर मन किंवा व्यक्ती रोज जे ऐकते पाहते , बोलते, शिकते अनुभव घेते तेच. वेगवगेळ्या माध्यमातून जसे TV,Mobile,न्युज channels,सार्वजनिक भाषणे, विविध social मीडिया वरील लिखाणे वादविवाद,hatred speeches, अर्थहीन daily soaps,मालिका, रिऍलिटी shows(बी बॉस सारखे), हिंसक ऑनलाइन games, porn,सतत कुणीतरी केलेला अपमान अवहेलना, गळचेपी ह्या गोष्टी म्हणजे मनासाठी चे जंक फूड च होय. ह्या निकस पोषणावर अध्यात्मिक स्वास्थ्य दूरच निव्वळ मानसिक स्वास्थ्य देखील तग धरणार नाही.
****व्यसन: वरील पैकी गेम्स,पॉर्न आणि इत्तर भावभावनांचा अतिरेक अथवा उद्रेक वारंवार करत राहणे म्हणजे मनाला व्यसनाच्या खाईत ढकलनेच होय.
****इन्फेकशन: मानसिक स्वास्थ्य बिघवडवणारी कायिक वाचिक आणि मानसिक संगत म्हणजे इन्फेकशन च होय.
- शरीराला व्याधी मुक्त करण्यासाठी आपण काय करतो ?
अर्थात कुणीही सांगेल कि औषध, सकस अन्न, टॉनिक आणि व्यायाम !
अगदी तसेच मनाच्या स्वास्थ्यला काय आवश्यक ?
हेच अगदी हेच !
****मनाचे औषध : मनाचे समुपदेशन हेच मनाचे औषध. समुपदेशन म्हणजे सोप्या भाषेत कौन्सिलिंग. ते पण तज्ज्ञाकडून.
****मनासाठी सकस आहार : उत्तम पुस्तके, उत्तम दर्जाचे सकारात्मक चित्रपट , विनोदी वाचन- मालिका, उत्तम दर्जेदार वक्त्याचे भाषण, सेलेक्टड social media,मित्र परिवार आणि कुटुंबीयांबरोबर घालवलेला दर्जेदार वेळ हा मनाचा सकस आहार आणि टॉनिक होय
****मनाचा व्यायाम : मनाचा व्यायाम हा योग आणि ध्यानधारणा होय. तसेच आपले छंद जोपासणे, रोजच्या व्यापातून वेळ काढून भटकंती, निसर्गदर्शन, विविध खेळ आवर्जून खेळणे हा देखील मनाचा व्यायाम च होय. साधे सुडोकू आणि इतर मेंदू ला सकारात्मक ताण देणारी कोडी देखील मनाचा व्यायाम होय.
****मनाचे टॉनिक : मनाचे टॉनिक हि अवश्य मधून मधून गरजेचे होय.कुटुंब आणि मित्र परिवाराखेरीज सामाजिक बांधिलकी जपणे, छोट्या छोट्या सामाजिक उपक्रमातून समाजभान जपणे हे टॉनिक होय. आपल्या छोट्या कृतीतून एक दोन हास्य फुलवणे म्हणजे तर मनाला टॉनिक चा high डोस च ! ह्यावर अनेक मानसिक व्याधी दूर राहू शकतील इतका जालीम! असे टॉनिक आवर्जून घेणे उत्तम च. या टॉनिक मुळे वर उल्लेखच केलेल्या सद्गुणांची मनात आपोआप पेरणी होते.
आवर्जून जोपासलेले हे मानसिक/अध्यात्मिक स्वास्थ्य परिपूर्ण स्वास्थ्य नक्कीच जपेल. होलिस्टिक हेल्थ अजून काय ती वेगळी असते.
आज हि अध्यात्मिक स्वास्थ्याशी तोंडओळख नक्कीच एक वेगळी विचारधारा निर्माण करेल हि खात्री.
खूप सुंदर लिहिला आहे लेख !
धर्म आणि अध्यात्म यातला फरक , मनाचे स्वास्थ्य म्हणजे काय , आध्यात्मिक असणं म्हणजे काय हे उत्तम पद्धतीने मांडले आहे.
Good morning Dr. Rupali,Very nice article.I do read all the mails, sent by you.Kindly include me also on your whatsapp group. ( As its more easy to acess than e-mails.I do promise that I will not post any unnecessary or stupid comments.Many thanks & Best RegardsShrikant Phansalkar Vile Parle, Mumbai +91 9969497739Sent from my Samsung Galaxy smartphone.
Very well written Dr. Rupali! And a big thank you, I started doing meditation n exercise when you told me to 🙂 and it has given me a new perspective to life!! You are doing a very good service to mankind!! Keep up the good work!
Very neatly & specifically written article.
Khupach chan lihile aahe .krupaya mala tumchya Whatsapp gp var samil karave .
Ph no 8806663100
Great Ma’am thanks for sharing