Feed me soul full: food in illness.
पथ्य कल्पना पथ्य अन्न :(आजारपणात अन्न) पथ्य अन्न हि आयुर्वेदातील एक खूप वेगळी आणि एकमेव विचारधारा आहे. जेंव्हा पचनशक्ती मंदावलेली असते,व्याधी झालेले असतात तेंव्हा अर्थातच शरीर नेहमीप्रमाणे अन्न पचवू शकत नाही. किंबहुना अशा वेळेस खाल्ले गेलेले चुकीचे अन्न व्याधी वाढवण्यास च कारणीभूत होऊ शकते. मंदावलेला पाचक अग्नी हळू हळू सामान्य होईस्तोवर किंबहुना तोच सामान्य व्हावा …