धो धो पावसाळ्यातला रिमझिम आहार
पावसाळा म्हणजे टपरीवरचा वाफाळता चहा आणि गरमागरम कांदा भजे ! पावसाळा म्हणजे हातात लाडके पुस्तक,कॉफीचा कप आणि खिडकीचा एक छोटासा कोपरा. पावसाळा म्हणजे मुद्दाम छत्री रेनकोट दप्तरातच ठेवून भिजत भिजत घरी येऊन वळत टाकलेली पुस्तक वह्या आणि ओरडा खाल्लेला बाळू किंवा बाळी .पावसाळा म्हणजे अखंड कोसळत्या धारा झेलत सर केलेले दुर्ग .पावसाळा म्हणजे रद्द झालेली …